शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दौंडकरांना मिळणार हक्काचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:12 IST

अनेक वर्षांपासून दौंडच्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी संघर्ष सुरू होता.

खोर : अनेक वर्षांपासून दौंडच्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी संघर्ष सुरू होता. मात्र, हा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच दौंड तालुक्यातील दुष्काळी भागाला या आपल्या हक्काच्या पाण्याचा लाभ घेता येणार असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.खोर, देऊळगावगाडा, पडवी, कुसेगाव, माळवाडी ही गावे दर वर्षीच उन्हाळा तोंडावर आला, की पाणीटंचाईने भरडली जातात.दुष्काळ सहन करणे व पाण्याच्या संघर्षाला तोंड देणे ही कायमस्वरूपी परंपरा या भागातील शेतकरीवर्गाची होत होती. मात्र, आता ही टंचाईची परिस्थिती लवकरच आटोक्यात येणार असून, कार्यान्वित असलेल्या जनाई-शिरसाई व पुरंदर योजनेतून या दुष्काळी भागाला पाणी मिळणार आहे.मुंबई येथे सिंचन भवनात दौंडच्या पाणीप्रश्नावर बैठक घेण्यात आली. या वेळी खोरचे सरपंच सुभाष चौधरी, देऊळगावगाडाचे माजी सरपंच डी. डी. बारवकर, दिलीप डोंबे, विजय कुदळे, राहुल चौधरी, भानुदास डोंबे तसेच पाणी योजनेचे अधीक्षक अभियंता व अधिकारी वर्ग उपस्थित होता. या वेळी दौंड तालुक्यातील खोर, देऊळगावगाडा या गावांना पाणी सोडण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे.कार्यान्वित पुरंदर जलसिंचन उपसा योजनेच्या कार्यक्षेत्रात डोंबेवाडी पाझर तलाव हा येत नसल्याने पाणी सोडण्यात मोठी अडचण येत होती. पुरंदर जलसिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रात डोंबेवाडी पाझर तलाव हा घेण्यात यावा व बंदिस्त पाईपलाईनची योजना होऊन खोर व देऊळगावगाडा या गावांना पाणी मिळावे म्हणून बैठकीत निर्णय घेण्यात आलेला असून त्याचा प्रशासन विभागाकडे प्रस्तावदेखील सादर केला आहे. लवकरच या योजनेच्या माध्यमातून पाणी मिळणार आहे.>दोन दिवसांपूर्वी आमदार राहुल कुल यांनी खोरला पाणीप्रश्नासंदर्भात दौरा केला होता. या वेळी जनाई-शिरसाई योजनेच्या माध्यमातून खोरच्या पद्मावती व फडतरेवस्ती तलावात शेतकºयांना लोकवर्गणी भरूनदेखील पाणी सुटण्याची वाट पाहावी लागली होती. या वेळी राहुल कुल यांनी जनाई योजनेच्या अधिकारीवर्गाला चांगलेच धारेवर धरले आहे. ‘जनाई-शिरसाई योजनेला जे पाणी जाते, ते दौंडचे आहे. आमचेच पाणी आमच्याच लोकांना पैसे भरूनदेखील मिळणार नसेल, तर जनाई-शिरसाई योजनेला जाणारे पाणी दौंडमधून बंद करू,’ असा इशारा राहुल कुल यांनी सिंचन योजनेच्या अधिकाºयांना दिला. त्यानुसार जनाई-शिरसाई योजनेतून खोरच्या पद्मावती तलावात पाणी सोडण्यात आले असून फडतरेवस्ती तलावातदेखील आता पाणी लवकरच पोहोचणार आहे. दौंडच्या जनतेचे हक्काचे पाणी असूनदेखील वारंवार हक्क डावलला जात असेल, तर दौंडची जनता ही गप्प बसणार नाही, असे खडे बोल आमदार कुल यांनी सुनावले आहेत.