शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

गाड्या चोरणारा सराईत ‘डॉन’ जाळ्यात

By admin | Updated: May 11, 2017 04:53 IST

अधिकाऱ्यांनाच फोन करून ‘डॉन को पकडना मुश्कीलही नहीं नामुमकीन है’, असे जाहीर आव्हान देत गाड्या चोरणारा सराईत गुन्हेगार

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अधिकाऱ्यांनाच फोन करून ‘डॉन को पकडना मुश्कीलही नहीं नामुमकीन है’, असे जाहीर आव्हान देत गाड्या चोरणारा सराईत गुन्हेगार अखेर पुणे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मुंबई, जालना, बुलडाणा पोलिसांना चकवा देणाऱ्या या गुन्हेगाराला साथीदारासह गुन्हे शाखा युनिट १च्या टीमला अटक करण्यात यश मिळाले. १००च्या आसपास त्याने गाड्या चोरल्या असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. सय्यद शकील सय्यद युसूफ (रा. जवाहरनगर इक्बाल चौक, बुलडाणा) व त्याचा साथीदार महमंद एजास जलालुद्दीन काझी (वय ४९, रा. मुर्गीनाला, टुटी मझीससमोर, चेलिपुरा औरंगाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चिंचवडमध्ये फिर्यादीकडून पहिला गुन्हा नोंदविल्यानंतर त्याचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू झाला. पुण्यासह मुंबई, जालना येथील चारचाकी गाड्या चोरणारे दोघे जुना बाजार शिवाजी स्टेडियम येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांना पकडल्यावर चौकशीमध्ये सय्यद शकील सय्यद युसूफ याने चिंचवड पोलीस स्टेशन येथील एक इनोव्हा गाडी चोरून ती हैदराबादला विकल्याचे सांगितले, पुणे, मुंबई, जालना, जळगाव येथून एकूण १० इनोव्हा गाड्या चोरल्याचे समोर आले.गेल्या दीड वर्षापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मुंबई पोलिसांना त्याने फोनवरून आपणाला पकडून देण्याचे आवाहन दिले होते. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ चे सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, गजानन सोनुने, संभाजी भोईटे, रवींद्र कदम, शशिकांत शिंदे, मेहबुब मोकाशी, उमेश काटे, प्रशांत गायकवाड, मोहन येलपले, कैलास गिरी, रिजवान जिनेडी, तुषार खडके, सुधाकर माने, प्रकाश लोखंडे, सुभाष पिंगळे, अशोक माने, श्रीकांत वाघवले यांनी कारवाई केली.