शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नृत्य, संगीताला ‘हेरिटेज’मानून संवर्धन व्हावे

By admin | Updated: January 11, 2016 01:09 IST

नृत्य आणि संगीत या दोनच कला निखळ भारतीयत्वाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कला आहेत. नृत्य आणि संगीत आपले अस्सल भारतीयत्व जोपासताना नव्या वाटा शोधताना दिसतात

पुणे : नृत्य आणि संगीत या दोनच कला निखळ भारतीयत्वाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कला आहेत. नृत्य आणि संगीत आपले अस्सल भारतीयत्व जोपासताना नव्या वाटा शोधताना दिसतात. या प्रयोगक्षम कला म्हणजे जिवंत कला असून त्यांचे अस्तित्व कालमर्यादित आहे. या कलांना ‘हेरिटेज’ मानून त्यांचे संवर्धन व्हायला हवे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नृत्यांगना आणि पहिल्या अखिल भारतीय नृत्य संमेलनाच्या अध्यक्षा शमा भाटे यांनी व्यक्त केली. या कलांचे जतन झाले नाही तर जाणाऱ्या पिढीबरोबर हा वारसा लुप्त होऊन जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.कलापिनी नृत्यालय सासवड, स्वामी विवेकानंद स्मारक समिती पुणे, अभिव्यक्ती पुणे आणि हिरकणी महिला प्रतिष्ठान सासवडतर्फे रविवारी पहिले अखिल भारतीय नृत्य संमेलन अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन समारोहात भाटे अध्यक्षपदावरुन बोलत होत्या. मुंबई विद्यापीठातील लोककला विभागाचे प्रा. डॉ. प्रकाश खाडगे, स्वागताध्यक्ष राजेंद्र शिळीमकर, धनश्री लोमटे, सुखदा खैरे, अमृता गोगटे आदी व्यासपीठावर होते. नृत्य क्षेत्रातील गुरुंच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन आणि नटराजपूजन करुन संमेलनाचे उद्घाटन झाले.भाटे म्हणाल्या, नृत्य हे संमिश्र कलामाध्यम आहे. नृत्याच्या हातात हात घालून संगीत आणि साहित्य प्रविष्ट होते, चित्र आणि शिल्पांची संवेदनशील जाणीव उत्पन्न झाल्याखेरीज, नृत्याला घनता प्राप्त होत नाही. त्यामुळे नृत्यकला आपल्या संपूर्ण वैभवासह, दिमाखाने, प्रस्तुत व्हायची असेल तर या सगळ्या पैलूंचा सांगोपांग विचार, अध्ययी आणि प्रस्तुती या दोन्हींच्या अंतर्गत होणे आवश्यक आहे. येणाऱ्या नव्या पिढीला हा वारसा पुढे नेण्यासाठी, कल्पनेची भरारी घेण्यासाठी, परंपरेचा स्त्रोत जपण्यासाठी परंपरेचा तोच धागा पकडून जागतिक पातळीवर भारतीय नृत्यकलेचा यथायोग्य दर्जा, स्थान, महत्त्व सिद्ध करण्यासाठी काय करायला हवे, हा प्रश्न आहे.महाराष्ट्राला स्वत:ची शास्त्रीय नृत्याची परंपरा नाही, परंतु ज्या दर्जाने, वैविध्याने, समृद्धीने महाराष्ट्रात नृत्य प्रस्तुत केले जाते त्याची नोंद समाजातल्या सर्व घटकांकडून घेतली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सुरुवातीस शमा भाटे यांनी नृत्याद्वारे शिवस्तुती सादर केली. संमेलनाचे थीमसॉँगवर कलासिद्धी नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशातील विविध नृत्यरचना सादर केल्या. अमृता गोगटे व स्वानंद लोमटे यांनी संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली़ (प्रतिनिधी)