शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नृत्याची साधनाच चिरंतन अन् मौलिक

By admin | Updated: April 29, 2017 04:28 IST

टीव्हीवर कोणताही चॅनेल लावल्यावर रिअ‍ॅलिटी शोचा भडिमार... ‘मुझे व्होट करने के लिए इस नंबर पर मेसेज करे’चे अपील... मेंटरकडून ‘स्टँडिंग ओव्हेशन’

प्रज्ञा केळकर-सिंग / पुणेटीव्हीवर कोणताही चॅनेल लावल्यावर रिअ‍ॅलिटी शोचा भडिमार... ‘मुझे व्होट करने के लिए इस नंबर पर मेसेज करे’चे अपील... मेंटरकडून ‘स्टँडिंग ओव्हेशन’ अथवा निवेदकाकडून ‘गिव्ह हिम अ बिग रन अप्लॉज’चे संवाद सातत्याने कानावर पडतात. नृत्यावर आधारित रिअ‍ॅलिटी शोची लाट पाहताना नव्या पिढीचा नृत्याकडील कल वाढत आहे, की ही पिढी पारंपरिक नृत्यापासून दूर चालली आहे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कंटेंपररी, बॉलिवूड, हिपहॉप अशा नृत्यांचे पेव फुटले असले तरी शास्त्रीय नृत्याचे मूलभूत शिक्षण घेतल्याशिवाय ते खऱ्या अर्थाने जाणून घेता येत नाही, अशा भावना नृत्यांगना आणि नृत्यशिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.२९ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय थिएटर संस्थेतर्फे जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर (१७२७-१८१०) यांचा हा जन्मदिन. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. जागतिकीकरणाच्या स्पर्शापासून नृत्य दूर राहिले नाही. त्यामुळे नृत्यावर पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव पडला. नृत्याचे नानाविध कंगोरे, प्रकार, स्टाईल भारतात लोकप्रिय होऊ लागल्या. सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील गाण्यांचा भडिमार, पाश्चात्त्य नृत्यशैली मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाल्या. रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांमुळे सध्याच्या पिढीमध्ये कंटेंपरररी, बॉलीवूड, हिपहॉप, सालसा, झुंबा अशा विविध प्रकारांचे गारुड पहायला मिळते. सध्या पुण्यात सालसा, हिपहॉप, भरतनाट्यम, बॉलीवूड असे विविध प्रकार लोकप्रिय झाले आहेत. नृत्यकला लोकाभिमुख झाली आहे, याचा अभिमान बाळगायला हवा. सर्व स्तरांतील लोकांमध्ये नृत्य कलेबाबत अभिरुची निर्माण होत आहे. मात्र, शास्त्रीय नृत्याबाबत अधिकाधिक जागृती निर्माण होण्याची आवश्यकता आहे.