शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

हा तर नृत्य, वक्तृत्वाचा संगम

By admin | Updated: January 9, 2017 02:39 IST

पुण्यात जन्म मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. हे रसिक, कलाकारांचं पुणं आहे. कलाकारांचा गौरव, सन्मान करण्याची पुण्याची तीनशे वर्षांची परंपरा आहे.

पुणे : पुण्यात जन्म मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. हे रसिक, कलाकारांचं पुणं आहे. कलाकारांचा गौरव, सन्मान करण्याची पुण्याची तीनशे वर्षांची परंपरा आहे. या परंपरेतील पुरस्कारार्थी असलेले पं. सुरेश तळवलकर यांचे वादन म्हणजे तबल्यावरच नृत्य, बोटातून प्रकट होणारं उत्कृष्ट दर्जाचे वक्तृत्व आहे, असे गौरवोद्गावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले.महापालिकेच्या वतीने ‘स्वरभास्कर पुरस्कार’ तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांना उपमहापौर मुकारी अलगुडे आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि १ लाख ११ हचार १११ रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी पं. उल्हास कशाळकर, माजी आमदार उल्हास पवार, माजी उपमहापौर आबा बागुल उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, ‘‘पं. तळ्वलकर, पं. कशाळकर ही सरस्वतीची मुलं आहेत. ते केवळ वादन किंवा गायन करीत नाहीत तर पुढच्या पिढीला शिकवण्याची परंपरा त्यांनी निर्माण करून मोठं काम केलं आहे.’’ (प्रतिनिधी)