शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दांपत्यास जबरी मारहाण

By admin | Updated: May 31, 2017 01:48 IST

सोलापूर-पुणे रेल्वे गाडीत एका दांपत्यास जबरी मारहाण केल्याप्रकरणी १0 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहीती

लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : सोलापूर-पुणे रेल्वे गाडीत एका दांपत्यास जबरी मारहाण केल्याप्रकरणी १0 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहीती दौंड रेल्वे पोलीस राजकुमार बाफना यांनी दिली.या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून यातील मुख्यसुत्रधार महिला फरार आहे. जावेद शेख (वय २२), महावीर साळवे ( वय २७ ), सुनील भोसले (वय २0 ), गणेश नगरे ( वय २0 ), महादेव ढवळे ( वय २0 ), सागर शिदे ( वय २१), पदमेश नगरे ( वय २२), अशोक साळवे ( वय ३२ ), गणेश शेलार ( वय १९ ), पैगंबर तांबोळी ( वय २३), विशाल नगरे ( वय ३0) हे सर्व आरोपी पारवडी (तालुका : करमाळा , जिल्हा सोलापूर) येथील रहीवाशी आहेत. याप्रकरणी भीमराव भोसले ( रा. पुणे ) यांनी दौंड रेल्वे पोलिसांना तक्रार दिली आहे . सोमवारी दुपारी सोलापर रेल्वे स्थानकातून सोलापूर - पुणे पॅसेंजर सुटली. रेल्वेच्या एका डब्यात भीमराव भोसले आणि त्यांचे नातेवाईक बसले होते. ही सर्व मंडळी लग्न समारंभ ऊरकून घरी परतीच्या प्रवासाला पुणे येथे निघाली होती. म्हाडा स्टेशन सोडल्यावर एका महिलेच्या धान्य पिशवीला एका लहान मुलाचा पाय लागला. या महिलेने लहान मुलाच्या कानफटात मारले. यावेळी संबंधीत महिला आणि लहान मुलाच्या नातेवाईकात शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर या महिलेने मोबाईलवर संवाद साधून काही व्यक्तींना पारवडी रेल्वे स्थानकाच्या अलीकडील स्टेशनवर बोलावून घेतले. १० जणाचे टोळके पारवडीच्या आलीकडील स्टेशवर सोलापूर पॅसेंजरच्या बोगीत आले . त्यांनी भीमराव भोसले आणि त्यांच्या पत्नीला लाकडी दांडके, वायरीच्या चाबकाने मारायला सुरूवात केली. या दांपत्यांना पारवडी स्टेशन येईपर्यंत मारहाण सुरू होती. पारवडी स्टेशन आल्यावर आरोपी आणि मुख्य सुत्रधार महिलेने पळ काढला. रेल्वेगाडी रात्री साडे आठच्या सुमारास दौंड रेल्वे स्थानकात आली, त्यानंतर मारहाण झालेल्या दांपत्यांनी दौंड रेल्वे पोलीसांना तक्रार दिली. त्यानुसार दौंड पोलिसांनी पारवडी येथे जाऊन मंगळवारी पहाटेच्या सुमारास आरोपींना अटक केली. नंतर हा गुन्हा कुर्डूवाडी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.