शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दत्तजयंती सोहळ्यानिमित्त भक्तांची गर्दी

By admin | Updated: December 25, 2015 01:58 IST

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...’ च्या गजरात आणि शेकडो भाविकांनी फुललेल्या दत्तमंदिरामध्ये दत्तजन्म सोहळा पार पडला.

पुणे : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...’ च्या गजरात आणि शेकडो भाविकांनी फुललेल्या दत्तमंदिरामध्ये दत्तजन्म सोहळा पार पडला. हभप विजयबुवा अपामार्जने यांच्या कीर्तनानंतर झालेला नेत्रदीपक दत्तजन्म सोहळा डोळ्यांत साठविण्याकरिता भाविकांनी गर्दी केली. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर परिसर भक्तिमय झाला होता. गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ०४ मिनिटांनी श्रीदत्तजन्म सोहळा झाला. पाळण्यावर पुष्पवृष्टी करून ‘दिगंबरा... दिगंबरा...’ असा जयघोष करण्यात आला. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते महाआरती झाली. दत्तगुरूंच्या पादुकांची पालखी नगरप्रदक्षिणा मंदिरातून वाजत-गाजत निघाली. नगरप्रदक्षिणेत सनई चौघडा, रथ, बँड, नादब्रह्म, ढोल-ताशा पथक, दत्तमहाराजांच्या पादुका ठेवलेला फुलांनी सजविलेला रथ पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होता. दत्तमंदिरापासून निघालेली पालखी रामेश्वर चौक, टिळक पुतळा मंडई, शनिपार, अप्पा बळवंत चौक, मजूर अड्डा, बुधवार पेठ मार्गे मंदिरात आली. मंदिराच्या पालखी मंडळातर्फे पालखीचे आयोजन केले गेले. दत्तजयंतीनिमित्त गुरुवारी शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील दत्तमंदिरांमध्ये फुले व दिव्यांची सजावट करण्यात आली होती. तसेच अनेक ठिकाणी या उत्सवानिमित्त भजन, कीर्तन यांचेही आयोजन करण्यात आले होते. याबरोबरच अनेक ठिकाणी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टतर्फे पहाटे पाच वाजल्यापासून कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे मंदिराचे कार्यकारी विश्वस्त शिरीष मोहिते यांनी सांगितले. यानिमित्त अपामार्जने यांच्या कीर्तनाचेही आयोजन केले होते. सायंकाळी दत्तजन्म सोहळा पार पडला. ७ दिवसांपासून मंदिरामध्ये भजन व कीर्तनाचे आयोजन केले होते. सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये ढोल-ताशा पथक, बँड पथक, यांबरोबर नागरिकांनी सहभाग घेतला होता. कॅम्पमधील साचापीर स्ट्रीटवरील सूर्यमुखी दत्तमंदिरात देविप्रसाद जोशी यांच्याहस्ते महापूजा करण्यात आली. भवानी पेठेतील दत्तगुरु माऊली प्रतिष्ठानतर्फे व सोमवार पेठेतील मित्र मंडळातर्फे या दिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.