शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

पालिकेला सांडपाण्याचा दुहेरी ‘भुर्दंड’

By admin | Updated: June 3, 2016 00:52 IST

शहरात तयार झालेले सांडपाणी शुद्ध करण्यासाठी महापालिकेकडून दर वर्षी ९ कोटींचा खर्च केला जात असतानाही, हे पाणी पूर्णपणे शुद्ध न केल्याने महापालिकेस दर वर्षी

पुणे : शहरात तयार झालेले सांडपाणी शुद्ध करण्यासाठी महापालिकेकडून दर वर्षी ९ कोटींचा खर्च केला जात असतानाही, हे पाणी पूर्णपणे शुद्ध न केल्याने महापालिकेस दर वर्षी तब्बल ५० लाखांचा जल उपकर (सेस) महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाला (एमपीसीबी) भरावा लागत आहे. त्यातच, जे पाणी शुद्ध करून नदीत सोडले जात आहे, ते पुन्हा सांडपाण्यात एकत्रित होत असल्याने हे पाणीही वाया जात आहे. त्यामुळे शहराला लागलेले सांडपाण्याचे ग्रहण आणि त्यासाठी दर वर्षी पुणेकरांच्या खर्चातून जाणारे दहा कोटी थांबणार कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.शहरात पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेस १२०० एमएलडी पाणी लागते. या पाण्यातील जवळपास ७५० एमएलडी पाण्याचे सांडपाणी तयार होते. हे सांडपाणी २००१ पर्यंत थेट नदीतच जात असल्याने शहराचे वैभव असलेल्या मुठा नदीतील प्रदूषणामुळे नदी मरणासन्न अवस्थेत आली आहे. त्यामुळे नदीला पुनरुज्जीवन देण्यासाठी महापालिकेकडून २००१ नंतर शहरात १० ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यासाठी तब्बल १८० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर या केंद्रांमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी दर वर्षी ९ कोटींचा खर्च करावा लागतो. या सर्व प्रकल्पांची क्षमता सुमारे ५५० एलएलडी असली तरी प्रत्यक्षात या प्रकल्पांमध्ये ४०० एमएलडी पाण्यावरच प्रक्रिया केली जाते. त्यामुळे ३५० एमएलडी मैलापाणी थेट नदीत जाते. परिणामी मुळा-मुठाचे जलस्रोत दूषित होत असून, हे मैलापाणी शुद्ध केलेल्या पाण्यातच पुन्हा मिसळत असल्याने शुद्धीकरणासाठी केलेला खर्चही वाया जात आहे. (प्रतिनिधी)प्रकल्पांची क्षमता संपली४महापालिकेने शहरात उभारलेल्या या दहा मैलापाणी प्रकल्पांची क्षमता ५५४ एमएलडी प्रतिदिन असली तरी, हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कागदावरती महापालिकेकडून ४00 एमएलडी पाण्याचे शुद्धीकरण दाखविले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र हे प्रमाण ४0 टक्केच म्हणजे २८0 ते ३४0 एमएलडी प्रतिदिन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एका बाजूला हे प्रकल्प बंद पडण्याच्या अवस्थेत आले असले तरी महापालिकेकडून या प्रकल्पांना पर्यायी म्हणून उभारण्यात येणाऱ्या नदीसुधार योजनेतील इतर प्रकल्पांचे काम निधीअभावी सुरू करण्यात आलेले नाही.हजार नदीसुधार योजनेकडे लक्ष४महापालिकेकडून केंद्र शासनाच्या मदतीने जपानमधील जायका कंपनीच्या माध्यमातून मुळा-मुठा नदीसुधार योजना प्रकल्पांतर्गत तब्बल ९९५ कोटींच्या कामास मान्यता मिळविली आहे. या योजनेतील ८० टक्के निधी ही कंपनी देणार आहे. ४त्याअंतर्गत शहरात नवीन १० मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून, जुने आणि नवीन प्रकल्प अशी प्रतिदिन ९०० एलएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पास मान्यता मिळून सहा महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप एक दमडीही महापालिकेस मिळालेली नाही. तसेच हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे ६ वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागेपर्यंत महापालिकेस हा दुहेरी भुर्दंड पालिकेस आणि पर्यायाने पुणेकरांच्या खिशालाच बसणार आहे.