शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीत घुमणार लाऊडस्पीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 04:07 IST

साऊंड, लाइट, जनरेटर्स ही सेवा पुरविणाºया व्यावसायिकांनी पुकारलेला बंद प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर मागे घेतल्यामुळे आता दहीहंडीसह गणेशोत्सवात लाऊडस्पीकरचा आवाज घुमणार आहे.

पुणे : साऊंड, लाइट, जनरेटर्स ही सेवा पुरविणाºया व्यावसायिकांनी पुकारलेला बंद प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर मागे घेतल्यामुळे आता दहीहंडीसह गणेशोत्सवात लाऊडस्पीकरचा आवाज घुमणार आहे. ४ बेस आणि ४ टॉप स्पीकर लावण्याची मुभा दिल्यानंतर, संप मागे घेण्यात आल्याचे साऊंड अँड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशनतर्फे सांगण्यात आले आहे.डीजे लावण्यासंदर्भात प्रशासनाचे नियम स्पष्ट नसून शहराच्या विविध भागात वेगवेगळे नियम लावले जात आहेत. त्यामुळे डीजेचालकांना पोलिसांकडून नाहक त्रास होत आहे. पोलिसांकडून होणारी मारहाण, क्षुल्लक कारणावरून साऊंड सिस्टिम जप्तच्या कारवाईच्या निषेधार्थ ११ आॅगस्टपासून हा संप पुकारण्यात आल्याचे साऊंड अँड इलेक्ट्रिक्लस जनरेटर्स असोसिएशनने स्पष्ट केले. या संपास पुणे शहरातील सर्व साऊंड, लाइट आणि जनरेटर मालकांनी, तसेच मुंबईतील पाला या संघटनेनेदेखील पाठिंबा दर्शविला होता. व्यावसायिकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही मंडळांना दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी स्पीकर पुरवण्यात येणार नाहीत, अशी भूमिका असोसिएशनने घेतली; शिवाय शहरातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमांनाही स्पीकर पुरवण्यात येणार नाहीत, असा पवित्रा संघटनेने घेतल्याने शुक्रवारी पुण्यात आयोजित कार्यक्रमांच्या संयोजकांची तारांबळ उडाली. शनिवारी पोलीस प्रशासन आणि साऊंड व्यावसायिकांमध्ये बैठक पार पडली. बैठकीत अनेक तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा झाली.पोलीस प्रशासन आणि साऊंड व्यावसायिक यांच्यामध्ये चचेर्तून तोडगा निघाल्याने दहीहंडी आणि गणेशोत्सवात स्पीकरचा आवाज पुन्हा एकदा घुमणार आहे. संप मागे घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही चैतन्याचे वातावरण पसरले आहे. परंतू, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी किंवा साऊंड व्यावसायिकांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद पोलिसांकडून देण्यात आली आहे