शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाघोलीत सराफी दुकानावर दरोडा

By admin | Updated: May 3, 2017 02:00 IST

सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी वाघोली येथील बाइफ रस्त्यालगत असणाऱ्या बगाडे ज्वेलर्स मध्ये बंदुकीचा

वाघोली : सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी वाघोली येथील बाइफ रस्त्यालगत असणाऱ्या बगाडे ज्वेलर्स मध्ये बंदुकीचा धाक दाखवून १७ तोळे सोने चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमाराम घडली. दुकानातील सेल्समन महिलेने सायरन वाजविल्याने दोघांनी हातात येईल तेवढे सोने घेत दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला़ या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यातील एकाने बंदुकीतून गोळी झाडली. यामध्ये सेल्समनच्या मानेला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.सिद्धेश निवृत्ती भुजबळ (वय २४, रा. तळेगाव ढमढेरे, पुणे) असे जखमी झालेल्या सेल्समनचे नाव आहे.याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील बाइफ रस्त्यालगत बगाडे ज्वेलर्स हे सोने, चांदी खरेदीचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या दुकानामध्ये एक तरुण सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आला होता. दुकानातील सेल्समनने त्याला सोन्याची चैन व अंगठी दाखविली. दहा मिनिटांनंतर आणखी एक तरुण तोंडाला रुमाल बांधून बगाडे ज्वेलर्समध्ये दाखल झाला. आपल्याकडील बंदूक काढून त्याने सेल्समन आणि दोन महिला ग्राहकांना धमकाविण्यास सुरुवात केली. पहिल्यापासून दुकानात उपस्थित असणाऱ्या तरुणाने देखील त्याच्याकडील बंदूक बाहेर काढून सेल्समनवर रोखली. हिंदी भाषेत संभाषण करणाऱ्या दोघांनी ‘मुझे खून खराबा पसंद नही सब चूप चाप बैठो’ अशी धमकी देवून बंदूक रोखली होती. चोरट्याकडील बंदूक पाहून सर्वच सेल्समन घाबरले होते. चोरटे दुकानातील सोने चोरून नेणार एवढ्यातच अनिता जगताप या सेल्समन महिलेने भेदरलेल्या अवस्थेमध्येच प्रसंगावधान राखून सायरन वाजविला. सायरनचा आवाज ऐकून दोन्ही चोरटे घाबरून सोन्याच्या अंगठ्या ठेवलेल्या ट्रेमधील मिळतील तेवढ्या अंगठ्या घेवून दुकानाच्या बाहेर आले. दुकानाच्या बाहेर असणाऱ्या दुचाकीवर दोघेही बसून जात असताना सेल्समन सिद्धेश भुजबळ याने दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पकडण्याचा प्रयत्न होत असल्याने एकाने त्याच्याकडील बंदुकीतून सिद्धेश भुजबळच्या दिशेने एक गोळी झाडली व पुणे नगर महामार्गाच्या दिशेने पसार झाले.मानेला गोळी लागल्याने भुजबळ हा गंभीर जखमी झाला होता तर याचवेळी दोघांना पकडण्यासाठी आलेले मॅनेजर शिवाजी आसवले गोळीबारातून बचावले. चोरटे पसार झाल्यानंतर घटनेबाबतची माहिती पोलिसांना कळवून भुजबळ यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यात आली होती.