देवरुख : समोरुन येणाऱ्या ट्रकला बाजू देताना एस. टी. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या डाव्या बाजूला शेतात पलटी होऊन २० जण जखमी झाले. हा अपघात आज (बुधवारी) सकाळी ५.४५ च्या सुमारास कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर दाभोळे मालपवाडी येथे घडली. पुणे - रत्नागिरी ही रत्नागिरी आगाराची (एमएच ०६ एस ८१७२) गाडी कोल्हापूरमार्गे रत्नागिरीला येत होती. चालक संदीप सुतार हे बस चालवत होते. रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावर साखरपानजीकच्या दाभोळे मालपवाडी येथे आल्यावर समोरुन येणाऱ्या ट्रकला बाजू देताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या डाव्या बाजूला शेतात उलटली. यामध्ये सुदैवाने प्राणहानी टळली आहे. मात्र, २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पुणे चिंचवड - रत्नागिरी या बसमध्ये ३१ प्रवासी प्रवास करत होते. यातील जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये राजकुमार पाटील (बीड), अमितेश सुर्वे (खेडशी), विष्णू पांचाळ (बेनीबुद्रुक), अशोक जोयशी (रत्नागिरी), वाहक अल्ताफ पठाण, महमद अन्सारी (कराड), राजकुमार धपाटे (बीड), स्वप्नील जाधव (२५), सूर्यकांत जाधव (५५, राजापूर), रेणुका लांजेकर (४०, पुणे), चंद्रकांत मंचेकर (३७, पुणे), सुरेश दुधवडकर (७४, पाली), सुनंदा दुधवडकर (६८, पाली), शैलेश गुरव (२४, लांजा), रत्नकुमार धपाटे (२९, बीड), भारती धोत्रे (४५, पुणे), सागर नगरकर (३५, हडपसर - पुणे), संदीप लुनाट (२५, बांबार्डे), विजया नगरकर (६०, हडपसर - पुणे), सलाउद्दीन कुरेशी (२५, पुणे) यांचा समावेश आहे.अधिक तपास साखरप्याचे हेडकॉन्स्टेबल डी. एस. पवार करत आहेत. अपघातात बसचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
दाभोळेत एस. टी. बस उलटून २० प्रवासी जखमी
By admin | Updated: August 6, 2014 23:20 IST