शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानांसाठी खटाटोप, तोही जेजुरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 05:48 IST

तीर्थक्षेत्र जेजुरीत नगरपालिका संपूर्ण दारूबंदीसाठी ठराव करण्याच्या तयारीत असताना, नियमात बसवून काही दारूधंदे सुरू करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचाच आटापिटा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत नगरपालिका संपूर्ण दारूबंदीसाठी ठराव करण्याच्या तयारीत असताना, नियमात बसवून काही दारूधंदे सुरू करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचाच आटापिटा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वस्तुत: जेजुरीत शासनाने लोकसंख्येनुसार महामार्गापासून २२० मीटर अंतराबाहेरील दारू दुकानांना परवानगी आहे.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयातील नियम व अटींत येथील काही दारूधंदे बसत नसतानाही उत्पादन शुल्क विभाग भूमिअभिलेख व सार्वजनिक बांधकाम विभागाला हाताशी धरून हा खटाटोप करीत असल्याचा आरोप शुक्रवारी उपनगराध्यक्ष गणेश निकुडे व माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते हरिदास रत्नपारखी यांनी पत्रकार परिषदेत घेऊन केला.शहराच्या मध्यवर्ती भागातील कुंभारवाडा येथील सि. स. नं. ११४ व ११५ मध्ये बारामती येथील राजेश गालिंदे यांचे देशी दारूचे दुकान आहे. अटी व नियमांचे पालन करीत नसताना ते दुकान गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहे. मुळात या जागेवर असलेले पालिकेचे सार्वजनिक शौचालय पाडून हे दुकान सुरू आहे. नगरपालिका आणि दुकानमालक राजेश गालिंदे यांच्यात न्यायालयात दावा सुरू आहे.न्यायालयानेही त्या दुकानाविरुद्ध निकाल दिलेला असून पुन्हा पुन्हा न्यायालयात जाऊन दुकान सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पालिकेच्या परस्पर मोजणी करून ते सुरू करण्याचा आटापिटा होत आहे. याबाबत वारंवार मोजण्या आणून दुकान २२० मीटरच्या बाहेर असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप या वेळी निकुडे यांनी केला आहे.माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई यांचे जनता बार हे शहराच्या मध्यवस्तीत आहे. हे बार तर राज्य मार्गाच्या १०० फुट अंतरावर आहे. मात्र ते सुरू करताना पूर्वी पालिकेच्याच खर्चातून बांधलेला रस्ता भिंत घालून बंद करून दुसरीकडून मोजणी करून सुरू केले आहे. याबाबत माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारही केलेली आहे. तक्रारीनुसार याही बारच्या अंतराची मोजणी करण्यात आली आहे़संपूर्ण दारूबंदीसाठी ठरावजेजुरी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने येथे संपूर्ण दारूबंदी केली जावी, ही मागणी होत असल्याने जेजुरी पालिकेकडून याबाबतचा ठराव घेण्यात येणार आहे. याबाबत पालिकेच्या नगराध्यक्षा, सर्व नगरसेवकांशी चर्चाही केलेली आहे. यासाठी मी स्वत; पुढाकार घेणार असल्याचे निकुडे यांनी या वेळी सांगितले....तर आंदोलन उभारूउत्पादन शुल्क, भूमिअभिलेख व सार्वजनिक बांधकामने असे प्रकार करू नयेत, अशी पालिकेची मागणी आहे. असे प्रयत्न सुरूच राहणार असतील तर जेजुरी पालिकेच्या वतीने कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्यात येणार आहे. शिवाय वेळप्रसंगी आंदोलनही उभारण्याचा इशारा नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी दिला आहे.काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतचे दारूधंदे बंद करण्याचा निर्णय घेऊन तशी अंमलबजावणीही सुरू आहे. मात्र उत्पादन शुल्क विभागाकडून या निर्णयाची तोडफोड करून बंद झालेली दुकाने सुरू करण्याचा सपाटा लावलेला आहे.अगदी रस्त्यालगतच्या दुकानांची प्रवेशद्वारे बंद करून दूरवरून रस्ते दर्शवून दुकाने सुरू करण्यात आली आहेत. तसे प्रयत्न जेजुरीतही होत असून नागरिकांतून असंतोष आहे.