शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

सिलिंडर मुबलक, पण विनाअनुदानीत

By admin | Updated: July 7, 2015 05:08 IST

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ््यात सहभागी होणाऱ्या दिंड्यांना यंदा विनाअनुदानित गॅस सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे.

पुणे : संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ््यात सहभागी होणाऱ्या दिंड्यांना यंदा विनाअनुदानित गॅस सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे.केंद्र शासनाने अनुदानित गॅस सिलिंडर मिळण्यासाठी ३० जूनपर्यंत गॅस सिलिंडर बँक लिकींग करण्याची अखेरची मुदत दिली होती. पुणे, सातार, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ९० टक्क्यांपेक्षा अधिक दिंड्याच्या मालकांनी अशा प्रकारे गॅस बँक लिकींग केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दिंड्यांना आता ६३९ रुपयांनी गॅस सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे. हा पुरवठा मुबलक प्रमाणात करण्याचे आदेश सर्व गॅस कंपन्यांना देण्यात आल्याची माहिती पुरवठा उपायुक्त प्रकाश कदम यांनी दिली. यंदा पुणे जिल्ह्यातून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ््यात सुमारे ६०० पेक्षा अधिक दिंड्या सहभागी होणार आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील दिंड्या पंधरा दिवसांसाठी २३ हजार गॅस सिलिंडर, सातारा जिल्ह्यासाठी २६ हजार गॅस सिलिंडर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी १६ हजार गॅस सिलिंडर लागतील, असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु, यातील अनेक ंिदंड्यांच्या मालकांनी आपले सिलिंडर ३० जूनपर्यंत बँक लिकिंग केलेर नाही. ज्यांनी बँक लिकींग केले आहे, त्याअनाचा सध्या शासनाच्या अनुदानाचा लाभ देण्यात येतो. यामुळे या सर्व दिंड्यांना एका सिलिंडरमागे सुमारे १९० रुपयांचा भुर्दंड पडणार आहे. (प्रतिनिधी)रॉकेलचा पुरवठा करण्याचे दुकानदारांना आदेशशासनाकडे वेळोवेळी मागणी करुन देखील पालखी सोहळ््यासाठी स्वतंत्र रॉकेलचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विशेष नियोजन करुन येणाऱ्या कोट्यातून पालखी सोहळ््यात सहभागी दिंड्यांना रॉकलेचा पुरवठा केला जातो. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दिंड्यांना सुमारे २ हजार ५२ लिटर रॉकलची मागणी असून, हा पुरवठा करण्याचे आदेश सर्व संबंधित रॉकेल दुकानदारांना देण्यात आले आहेत.

असे मिळणार गॅस सिलिंडरपालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्या विनाअनुदानित म्हणजे ६३९ रुपये व प्रत्येक गॅस सिलिंडर साठी स्वतंत्र १४५० रुपये डिपॉझिट असे एकूण २०८९ रुपये मोजावे लागणार आहे. यामध्ये ज्या दिड्यांनी बँक लिकींग केले आहे त्यांना शासनाचे ११९ रुपये अनुदान पुन्हा मिळणार आहे.