शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

लंडनच्या धर्तीवर पुण्यातही सायकल शेअरिंग

By admin | Updated: March 2, 2016 01:18 IST

लंडनमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा एक भाग म्हणून सर्वाधिक यशस्वी ठरलेली सायकल शेअरिंग सिस्टिम पुण्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती लंडनच्या दौऱ्यावर असलेले महापालिकेचे

पुणे : लंडनमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा एक भाग म्हणून सर्वाधिक यशस्वी ठरलेली सायकल शेअरिंग सिस्टिम पुण्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती लंडनच्या दौऱ्यावर असलेले महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. लंडनमधील वाहतूक, घनकचरा व पाणी व्यवस्थापनाशी संबंधित प्रकल्पांना त्यांनी भेटी देऊन त्याची माहिती घेतली.युकेमधील स्मार्ट प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी कुणाल कुमार यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील अधिकाऱ्यांचे पथक अभ्यास दौऱ्यावर गेले आहे. या पथकाने सोमवारी दिवसभर लंडनमधील विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. याबाबत कुणाल कुमार यांनी सविस्तर माहिती दिली.कुमार यांनी सांगितले, ‘लंडनमध्ये बस, केबलकार, टॅक्सी, सायकल या सर्व सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ या एकाच संस्थेकडून पाहिली जाते. या संस्थेच्या कार्यालयास आम्ही भेट दिली. सायकल शेअरिंग सिस्टिम अंतर्गत लंडन शहरामध्ये दररोज १२ हजार सायकली भाडे तत्त्वावर दिल्या जातात. त्यासाठी एक कंट्रोल रूम तयार करण्यात आली असून, तेथून संपूर्ण शहरात नियंत्रण ठेवले जाते. उत्कृष्ट पद्धतीने त्याचे नियोजन केले जात असून, पुण्यामध्ये हा प्रयोग राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी त्यांच्याशी स्वतंत्रपणे संपर्क साधला जाणार आहे.’शहरातील वाहतुकीचा शास्त्रीय पद्धतीने सर्व्हे करण्यासाठी एका खासगी संस्थेने चांगली व्यवस्था विकसित केली आहे. सर्वसाधारण सर्व्हेमध्ये खूपच कमी लोकांपर्यंत पोहोचता येते. या व्यवस्थेअंतर्गत वाहतुकीचे विविध प्रकारचे सर्व्हे करून नागरिकांच्या सार्वजनिक वाहतुकीबाबतच्या गरजा जाणून घेता येऊ शकतील. एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के लोकांपर्यंत या व्यवस्थेच्या माध्यमातून पोहोचता येते. ही सर्व्हेची प्रणाली पुण्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकेल. त्याकरिता संबंधित संस्थेला याचे तपशीलवार सादरीकरण करण्यासाठी पुण्यामध्ये आमंत्रित करण्यात आले आहे.’घनकचरा उचलण्यासाठी राबविण्यात येणारी सेन्सर प्रणालीला आम्ही भेट दिली. त्याचबरोबर पाण्याची पाइपलाइन फुटण्यापूर्वीच तिची दुरुस्ती करण्याची एक सुरेख व्यवस्था तिथे निर्माण करण्यात आली आहे, त्याची आम्ही सविस्तर माहिती घेतली. पुण्यामध्ये २४ तास पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे, त्याअंतर्गत या प्रणालीचा वापर करता येऊ शकेल. यामुळे पाण्याची नासाडी वाचविता येऊ शकेल, असे कुमार यांनी स्पष्ट केले. घनकचरा, पाणी, वाहतूक व्यवस्थेशी संबंधित प्रकल्पांना दिवसभर भेटी देण्यात आल्या. बुधवारी प्रिस्ट्रल शहराच्या महापौरांशी भेट नियोजित आहे, अशी माहिती कुणाल कुमार यांनी दिली.