शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित विमा कंपनीच्या ग्राहकांची सायबर चोरट्यांनी केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लम्बोर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला सायबर चोरट्यांनी लक्ष्य केले असून, कंपनीच्या ग्राहकांचा डाटा चोरून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लम्बोर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला सायबर चोरट्यांनी लक्ष्य केले

असून, कंपनीच्या ग्राहकांचा डाटा चोरून पॉलिसी विभागामधून बोलत असल्याचे

सांगून फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी लम्बोर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचे तपास अधिकारी विशाल काटकर (वय

५०, रा़ बंडगार्डन) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. हा प्रकार

१५ जुलैपासून आतापर्यंत घडला आहे. कंपनीच्याच एखाद्या जुन्या कर्मचाऱ्र्यांनी हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

सायबर चोरट्याने कंपनीतील ग्राहकांचा डाटा चोरला़ त्यानंतर त्यांच्या पॉलिसीचे नूतनीकरण करायचे आहे़ अशा ग्राहकांना त्यांनी कंपनीच्या नावाने बनावट ई-मेल पाठविला़ तसेच या पॉलिसी ग्राहकांना कंपनीच्या पॉलिसी

विभागामधून बोलत असल्याचे सांगितले. कंपनी वाहन विमा, प्रॉपर्टी विमा, आगप्रतिबंधक विमा, आरोग्य विमा अशा वेगवेगळ्या पॉलिसीचे नूतनीकरण करून दिले जातात, असे ग्राहकांना सांगत. त्यानंतर पेमेंट करण्यासाठी त्यांना एचडीएफसी बँकेचा खाते क्रमांक व एक लिंक देऊन त्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. ग्राहकांनी पॉलिसी नूतनीकरणासाठी पैसे पाठविल्यानंतरही त्यांच्या पॉलिसीचे नूतनीकरण न झाल्याने त्यांनी कंपनीकडे तक्रारी केल्या. त्यानंतर कंपनीने केलेल्या तपासात हा सर्व प्रकार उघडकीस आला. ग्राहकांच्या फसवणुकीसाठी किमान ६ मोबाईलचा वापर करण्यात आला आहे. पुणे शहरातील काही जणांची तसेच देशातील इतर भागातील काही ग्राहकांची फसवणूक झाली आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंतामण अधिक तपास करीत आहेत.