शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

कटआॅफने होऊ शकते फसगत

By admin | Updated: May 20, 2017 05:13 IST

काही खासगी कोचिंग क्लास व महाविद्यालयांमध्ये झालेल्या छुप्या करारांमुळे अकरावी प्रवेशाचे कटआॅफ फसवे असण्याची शक्यता आहे. या करारानुसार

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : काही खासगी कोचिंग क्लास व महाविद्यालयांमध्ये झालेल्या छुप्या करारांमुळे अकरावी प्रवेशाचे कटआॅफ फसवे असण्याची शक्यता आहे. या करारानुसार काही महाविद्यालयांकडून ठराविक क्लासशी संबंधित चांगले गुण असलेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रक्रियेतून विज्ञान शाखेत प्रवेश मिळवून दिला जातो. त्यामुळे तुलनेने चांगल्या सोयीसुविधा नसलेल्या या महाविद्यालयांचे ‘कटआॅफ’ आपोआपच वाढत असल्याचे चित्र आहे. तसेच या वर्षी काढण्यात येणाऱ्या माहिती पुस्तिकेमध्ये मागील वर्षीच्या दुसऱ्या प्रवेश फेरीतील कटआॅफ दिले जाणार आहेत. त्यामुळे कटआॅफ पाहून पसंतीक्रम दर्शविल्याने विद्यार्थ्यांची फसगत होण्याची शक्यता अधिक आहे.केंद्रीय प्रवेश समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने पार पाडली जाते. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना आॅनलाईन महाविद्यालयांचे पसंतीक्रम दर्शविणे बंधनकारक आहे. हे क्रम ठरविताना अनेक विद्यार्थी संबंधित महाविद्यालयाचे मागील वर्षीचे कटआॅफ पाहून निर्णय घेतात. माहिती पुस्तिकेमध्ये हे कटआॅफ दिले जातात. त्यानुसार विद्यार्थी या कटआॅफचा आधार घेत पसंतीक्रमामध्ये संबंधित महाविद्यालयाचे नाव वरच्या क्रमांकावर टाकतात. मात्र, प्रत्यक्षात काही महाविद्यालयांत कटआॅफच्या तुलनेत दर्जेदार सुविधा, शिक्षक उपलब्ध नसल्याचे आढळून येते. याबाबत मागील वर्षी काही विद्यार्थ्यांनीही तक्रारी केल्या होत्या. हेच चित्र किंबहुना त्याहून अधिक तक्रारी यंदा वाढण्याची शक्यता आहे.कोचिंग क्लास-महाविद्यालयांमध्ये छुपा करारशहरातील काही कोचिंग क्लास व विज्ञान शाखा असलेल्या महाविद्यालयांमध्ये छुप्या करारांमध्ये वाढ झाल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे. या करारानुसार क्लासमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांत प्रवेश मिळवून दिला जातो. यातील बहुतेक विद्यार्थी ७५ ते ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले असतात. प्रवेश मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थित राहण्यासाठी सशुल्क सवलत दिली जाते. या सवलतीमुळे महाविद्यालयांचे कटआॅफही वाढते. मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या या करारांमुळे यंदाही विद्यार्थ्यांची कटआॅफमुळे फसगत होण्याची शक्यता आहे. यंदाच्या माहिती पुस्तिकेमध्ये महाविद्यालयांसमोर देण्यात येणारे कटआॅफ मागील वर्षीच्या प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे दिले जाणार आहेत. मागील वर्षी पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी एक बेटरमेंटची संधी देण्यात आली होती. त्यामुळे माहिती पुस्तिकेत दुसऱ्या फेरीतील कटआॅफ देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारणांमुळे कटआॅफ पाहून संबंधित महाविद्यालयात प्रवेशासाठी पसंती दर्शविणे विद्यार्थ्यांना महागात पडू शकते. कटआॅफ केवळ मार्गदर्शकमाहिती पुस्तिकेमध्ये देण्यात येणारे कटआॅफ मागील वर्षीच्या प्रवेशप्रक्रियेतील दुसऱ्या फेरीचे असतील. हे कटआॅफ केवळ मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदविताना संबंधित महाविद्यालयाची माहिती घेणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील सोयीसुविधा, शिक्षक, अध्यापन, घरापासून महाविद्यालयाचे अंतर अशा गोष्टींची माहिती घेऊनच पसंतीक्रम देणे अपेक्षित आहे.- मीनाक्षी राऊत, विभागीय सहायक शिक्षण संचालिका