शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांच्या प्रवेशाचे कटआॅफ यंदाही वाढणार

By admin | Updated: June 1, 2017 02:48 IST

बारावीचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला, निकालामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर

पुणे : बारावीचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला, निकालामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख महाविद्यालयांच्या प्रवेशाचे कटआॅफ यंदा वाढणार आहेत. विज्ञान शाखेमधून सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, त्यामुळे या शाखेसाठी सर्वाधिक चुरस असणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या चौकशीसाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी बुधवारी महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रियेची चौकशी केली. त्याचबरोबर महाविद्यालयांच्या संकेतस्थळावरून प्रवेशाची माहिती घेण्यात आली. प्रमुख महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना मंगळवारी त्यांना पडलेल्या गुणांची टक्केवारी आॅनलाइन समजली असली तरी प्रत्यक्ष गुणपत्रिका ९ जून रोजी गुणपत्रिका मिळणार आहेत. दरम्यानच्या काळात त्यांना प्रवेश हव्या असलेल्या महाविद्यालयांचे आॅनलाइन अर्ज भरून ठेवता येणार आहेत.पुणे जिल्हयातून ९०.५९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. विज्ञान शाखेतून सर्वाधिक ५ लाख १६ हजार ११७ विद्यार्थी (९५.८५ टक्के) उत्तीर्ण झाले. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखेतून ३ लाख २३ हजार ४१५ विद्यार्थी (९०.५७ टक्के) उत्तीर्ण झाले. कला शाखेतून ३ लाख ८९ हजार ८० विद्यार्थी (८१.९१ टक्के) उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेबरोबरच कला आणि वाणिज्य शाखेच्या कटआॅफमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. बारावी परीक्षेमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ८१९ इतकी आहे. सर्व विद्यार्थ्यांमधून ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १० हजार ७८४ इतकी आहे. मुंबई विभागातून ३ लाख १७ हजार ६१५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३६ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. पुणे विभागातून २ लाख ३० हजार ८७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १७ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले.तुकड्या वाढण्याची शक्यता कमीचबारावीच्या निकालामध्ये ३ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी महाविद्यालयांच्या तुकड्या वाढण्याची शक्यता कमी आहे. कारण तुकड्या वाढविण्यासाठी यापूर्वीच विद्यापीठांकडे प्रस्ताव सादर करावे लागतात. आता तुकड्या वाढविण्याची प्रक्रिया सुरू करणे अवघड ठरणार आहे. त्यामुळे उपलब्ध जागेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मोठी चुरस असणार आहे.