शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

चलन नसल्याने ग्राहक परतले घरी

By admin | Updated: January 11, 2017 02:10 IST

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डेहणे शाखेत चलनपुरवठ्याअभावी खातेदार, शेतकऱ्यांना पैसे न घेताच परतावे लागत आहे.

डेहणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डेहणे शाखेत चलनपुरवठ्याअभावी खातेदार, शेतकऱ्यांना पैसे न घेताच परतावे लागत आहे. रिझर्व्ह बँकेने जिल्हा मध्यवर्ती बँकेला आता व्यवहार करण्यास परवानगी दिली; परंतु बँकेकडील जमा झालेल्या जुन्या नोटा अजूनही बदलून दिल्याच नाहीत. पर्यायाने बँॅक ग्राहकांना रक्कम देण्यास असमर्थ ठरली आहे. या सर्व गोंधळात स्वत:चे पैसे असूनही ते मिळत नसल्याने शेतकरी, कामगार, कर्मचारी, व्यापारी व महिला हतबल झाले आहेत. शहरातील व्यवहार कॅशलेसमुळे निदान बरे आहेत; पण ग्रामीण भागातील जनतेला मात्र दररोज अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गेले ६० दिवस गोरगरीब कसाबसा प्रापंचिक खर्च भागवत आहेत. आता उधारीवर ही कोणी माल देत नाही, रोख पैसे तर दूरच.६० दिवसांनंतरही ना पैसे मिळतात, ना रांगा संपल्या. शाळेचा खर्च, घरखर्च, बी-बियाणे, दूध, दवाखाना अशा दैनंदिन गरजा पूर्ण करताना ग्रामीण जनता मेटाकुटीला आली आहे.शेतमालाचे भाव पडल्याने यंदाचा संपूर्ण हंगाम वाया गेला आहे. शेतातील उत्पन्न तर सोडाच; पण बी-बियाणे व खताचा खर्चही निघाला नाही. (वार्ताहर)