शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांची मागणी : होळीसाठी गोव-यांची आॅनलाइन विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 07:03 IST

आधुनिक काळातही होळी या सणाचे महत्त्व कायम आहे. पारंपरिक पद्धतीने साज-या होणा-या होळीसाठी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोव-यांची अग्नी पेटवून त्याची पूजा केली जाते.

स्वप्निल हजारे पिंपरी : आधुनिक काळातही होळी या सणाचे महत्त्व कायम आहे. पारंपरिक पद्धतीने साज-या होणा-या होळीसाठी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोव-यांची अग्नी पेटवून त्याची पूजा केली जाते. झपाट्याने होणा-या शहरीकरणामुळे गाई व जनावरांचे गोठे गायब झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची गरज पूर्ण करण्यासाठी गोवºयांची आॅनलाइन विक्री सुरू झाली आहे.देशभरात खेड्यांसह शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो. होळी पेटवून मनोभावे अग्नीदेवतेची पूजा केली जाते. होळीच्या ठिकाणी सुवासिनी नैवेद्य दाखवतात. वर्षानुवर्षे या सणाचे महत्त्व टिकून आहे. वाईट विचार नष्ट करून चांगल्या विचारांचा अंगीकार करणे या भावनेतून होळीचा सण साजरा केला जातो. होळीसाठी लागणा-या साहित्याला विशेष म्हणजे गाईच्या शेणापासून बनविण्यात येणा-या गोव-यांना फार महत्त्व असते. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना गोव-या उपलब्ध होत नाही. विविध वस्तूंची आॅनलाईन विक्री करण्यात अग्रेसर असणा-या काही कंपन्यांनी चक्क गोव-यांची आॅनलाइन विक्री सुरू केली आहे. होळीप्रमाणेच धार्मिक विधी, होमहवन याकरिता गोव-यांना मोठी मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन काही कंपन्यांनी आॅनलाइन गोव-या विक्रीची जाहिरात केली आहे.खेड्यातील गोव-यांना मागणी-खेड्यामध्ये घरोघरी शेतक-याकडे गाई, म्हशी असतात. या जनावरांच्या शेणापासून गोवºया तयार करून स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरात आणल्या जातात. उन्हाळ्यात घराच्या आवारात अथवा शेतात महिलावर्ग शेणाच्या गोव-या थापतात. ऐन पावसाळ््यात साठा केलेल्या गोव-यांचा स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापर होतो. या गोव-यांना आॅनलाइनच्या बाजारपेठेत एवढे महत्त्व येईल, असे शेतक-यांना कधीच वाटले नव्हते. परंतु आता शेतक-याकडील गोवºयाना चांगलाच भाव आला आहे.कंपन्यांची होम डिलिव्हरीची सुविधा-गोवºयांची नगाने विक्री होत आहे. नऊ गोव-याची किंमत दीडशे ते दोनशे रुपये असून, या गोवºयाची काही दिवसांत होम डिलिव्हरी मिळण्याचीदेखील सुविधा उपलब्ध आहे. विविध कंपन्यांच्या संकेतस्थळावर गोव-याची किंमत वेगवेगळी असली, तरी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोवºयांची आॅनलाईन विक्री होतेय हे नवल राहिलेले नाही. विशेष म्हणजे आकर्षक पॅकिग असणा-या विविध आकारातील गोव-यांना आॅनलाइन ग्राहकही मिळू लागला आहे. शहरात सर्वकाही आॅनलाईन आणि घरबसल्या खरेदी करणारा ग्राहक आता गोव-याही आॅनलाइन खरेदी करू शकणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड