शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृती जीवनासह विचारात असावी

By admin | Updated: January 9, 2017 03:34 IST

देशाच्या बाहेर गेल्यानंतर आपली संस्कृती काय आहे, याची जाणीव होते. पाश्चात्त्य गोष्टी आपण खूप पाहतो, त्याचे अनुकरणही करतो आणि

पुणे : देशाच्या बाहेर गेल्यानंतर आपली संस्कृती काय आहे, याची जाणीव होते. पाश्चात्त्य गोष्टी आपण खूप पाहतो, त्याचे अनुकरणही करतो आणि आपण पुरोगामी आहोत, असे म्हणतो. संस्कृतीतून जगण्याची प्रेरणा मिळत असेल तर ती आत्मसात करायला काय हरकत आहे? अशा शब्दांत ज्येष्ठ वास्तूविशारद बाळकृष्ण दोशी यांनी पुरोगाम्यांवर टीका केली. जीवन व्यवहारातच नव्हे, तर संस्कृती ही विचारातही असली पाहिजे, असेही ते म्हणाले.‘आम्ही नूमविय’च्या रविवारी झालेल्या महामेळाव्यात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते दोशी यांना ‘नूमविरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. संरक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ संशोधक डॉ. अजय लेले, खो-खो प्रशिक्षक श्रीरंग इनामदार, ज्येष्ठ नाट्य समीक्षक माधव वझे, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे डॉ. मधुसूदन झंवर यांना ‘नूमवियभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, आम्ही नूमवियचे अध्यक्ष अजित रावेतकर, सचिव मिलिंद शालगर, नूमवि शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी उमासे आदी उपस्थित होते. हा पुरस्कार माझ्या कल्पनेतही नव्हता. आयुष्यात ज्या गावात आपण कधी काळी राहतो? तिथे परत अशा माध्यमातून यायला मिळेल, असे कधीच वाटले नाही. पण या पुरस्कारासाठी आम्ही नूमवियचा फोन आला आणि ‘चला घरी परत जाऊया, हे माझे घर आहे,’ अशी भावना दोशी यांनी व्यक्त केली.मर्मबंधात ठेवावा असा हा सृजनात्मक सोहळा आहे, असे सांगून डॉ. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, नूमविच्या स्मरणरंजनातून नात्याचे संस्थाकरण होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र आगामी काळात शालेय शिक्षणाची नव्याने फेरमांडणी करण्याची गरज आहे. घिशापिट्या शिक्षणातून नव्या पिढीला बाहेर काढले पाहिजे. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)