शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
5
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
6
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
7
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
8
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
9
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
10
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
11
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
12
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
13
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
14
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
15
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
16
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
17
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
18
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
19
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
20
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!

समाजाला केले सांस्कृतिकदृष्ट्या साक्षर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:24 IST

वाणीभूषण प. पू. प्रीतिसुधाजी म.सा. यांनी समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या साक्षर केले आहे. समाजामध्ये चेतना निर्माण केली आहे. त्यांनी परंपरा आणि परिवर्तनाची सांगड घातली आहे.

पुणे : वाणीभूषण प. पू. प्रीतिसुधाजी म.सा. यांनी समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या साक्षर केले आहे. समाजामध्ये चेतना निर्माण केली आहे. त्यांनी परंपरा आणि परिवर्तनाची सांगड घातली आहे. यामुळे समाज सशक्त बनला आहे. मनुष्यातील अस्थिरता दूर करण्यासाठी संत महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे मत लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी व्यक्त केले.बिबवेवाडी जैन श्रावक संघाच्या वतीने जैन स्थानकामध्ये प.पू. प्रीतिसुधाजी म.सा. यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सकल जैन समाज अध्यक्ष विजय दर्डा, माजी मंत्री सुरेशदादा जैन, खासदार दिलीप गांधी, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, महापौर मुक्ता टिळक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेविका मानसी देशपांडे, रूपाली धाडवे, अनुसया चव्हाण, सुनील कांबळे, राजेंद्र शिळीमकर, बाळासाहेब ओसवाल, महेश वाबळे यांनी दर्शनाचा लाभ घेतला. या वेळी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल चोपडा, राजेश सांकला, माणिकचंद दुगड, प्रा. अशोक पगारिया, विजय भंडारी, विजयकांत कोठारी, प्रफुल्ल कोठारी, विलास राठोड, बाळासाहेब धोका, नरेंद्र सोळंकी, सुमतीलाल कर्नावट, बाबूशेठ बोरा, रमणलाल लुंकड, संजय चोरडिया रामलाल शिंगवी ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, महाव्यवस्थापक मिलन दर्डा आदी उपस्थित होते.दर्डा म्हणाले, ‘मनुष्य म्हणून जगलात तर महावीर होणे सरळ आहे. सर्वांप्रती दया, करुणा, सद्भावना आणि दातृत्वाची वृत्ती असावी. प.पू. प्रीतिसुधाजी म.सा. यांनी ओढलेल्या साधनेच्या रेषेचा आज अध्यात्माचा, संयमाचा आणि सद्भावनेचा रस्ता बनला आहे. त्यांना उत्तम स्वास्थ्य, प्रसन्नता आणि शांती लाभावी, अशी मी प्रार्थना करतो. प्रत्येक धर्मात चातुर्मासाचे महत्त्व आहे. जीवन जगण्याची शैली चातुर्मास शिकवतो. संतांच्या अंगावरील शुभ्र वस्त्र म्हणजे ज्ञान, ध्यान आणि साधनेचे प्रतीक आहेत. मात्र, आमच्या अंगावरील वस्त्रे ही भटकत्या आस्थेचे प्रतीक आहेत. ही अस्थिरता संतच दूर करू शकतात. जैन तत्त्वज्ञान विज्ञानवादी आहे. पंचमहाभूतांची पूजा म्हणजे पर्यावरणाची पूजा आहे. गोशाला उभारून आणि मुलांना संस्कार देऊन संत मोठे उपकार करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे मी नतमस्तक होतो.’सुरेशदादा जैन म्हणाले, ‘प.पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांनी विश्वासाठी समता, शांती आणि प्रेमाचा विचार दिला आहे. या विचाराचा विश्वामध्ये प्रचार होण्याची आवश्यकता आहे. अमृतमहोत्सवी वाढदिवस असल्याने शतायुषी व्हावे अशी सदिच्छा देतो. जळगावमधील प्रवचनाच्या आठवणी आजही ताज्या आहेत.’प.पू. दिनेशमुनीजी म.सा. आदिठाणा, प. पू. प्रतिभा कंवरजी म.सा. आदिठाणा, प.पू. प्रियदर्शनाजी म.सा. आदिठाणा, प. पू. वैभवश्रीजी म.सा. आदिठाणा, प. पू. आराधनाजी म.सा. आदिठाणा हे संत या वेळी उपस्थित होते.बिबवेवाडी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, नगरसेवक प्रवीण चोरबेले, माणिक दुगड, रमेशलाल गुगळे, कीर्तीराज दुगड, चंद्रकांत लुंकड, गणेश ओसवाल, अविनाश कोठारी, प्रवीण राका, अशोक लोढा, बाळासाहेब कोयाळीकर, रसिकलाल नहार, मनोज रायसोनी, रामलाल संचेती, विजय समदडिया, लालचंद कर्नावट, धनराज श्रीश्रीमाळ, पन्नालाल पितळीया, वर्धमान युवा ग्रुप, सत्य साधना महिला मंडळ, श्रृत बहु मंडळ, जय आत्मानंद ग्रुप यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.