शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण पुणो होणार सांस्कृतिक नगरी

By admin | Updated: September 1, 2014 23:37 IST

महापालिकेचे सभागृहनेते सुभाष जगताप यांच्या अथक प्रयत्नांतून दक्षिण पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पद्मावती येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाटय़गृह साकारले आहे.

पुणो : महापालिकेचे सभागृहनेते सुभाष जगताप यांच्या अथक प्रयत्नांतून दक्षिण पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पद्मावती येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाटय़गृह साकारले आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून असलेली रसिक व कलाकारांची मागणी फलद्रूप झाली आहे. कलारसिकांकडून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने हाउसफुल्लचे फलक सभागृहाबाहेर दिसत आहेत. 
शहराचा चारही दिशांनी वेगाने विकास होत आहे. दक्षिण पुणो म्हणून ओळख असलेल्या सहकारनगर, चव्हाणनगर, बिबवेववाडी, बालाजीनगर, धनकवडी, पद्मावती, मार्केटयार्ड व कात्रज परिसरात  लाखोंच्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. शिवाय, मध्यवर्ती शहरातील विविध पेठेतूनही नागरिक सहकारनगर व बिबवेवाडी या भागात रहिवासासाठी आले आहेत. त्यामध्ये नाटय़ रसिकांची संख्या मोठी आहे. मात्र, दक्षिण भागात राहणा:या नाटय़ रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रम व महोत्सवासाठी बालगंधर्व, एस.एम. जोशी, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह या दुस:या टोकाला असलेल्या नाटय़गृहात जावे लागत होते. त्यामुळे नागरिक व कलाकार मंडळींनी दक्षिण पुण्यात सांस्कृतिक केंद्र व नाटय़गृह उभारण्याच्या मागणीसाठी अनेकदा पाठपुरावा केला. 
दरम्यान, 2क्क्2मध्ये स्थायी समिती अध्यक्ष असताना सुभाष जगताप यांनी रसिकांची मागणी सत्यात उतरविण्यासाठी पद्मावती येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक व सांस्कृतिक नाटय़गृह उभारण्याची योजना मांडली. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून घेतली. या भागात राहणारे कलारसिक, कलाकार व निर्माते यांनी जगताप यांच्या कामांना साथ दिली. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून सुभाष जगताप यांनी शहरातील अत्याधुनिक व सर्व सोयीसुविधांयुक्त सांस्कृतिक नाटय़गृह उभारले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन झाले. अजित पवार यांच्यासह रसिक व कलाकारांनीही अत्याधुनिक नाटय़गृहाच्या उभारणीबद्दल कौतुक केले. अभिनेते नाना पाटेकर यांनी या नाटय़गृहाची महती ऐकून आवर्जून भेट देण्याची इच्छा प्रकट केली आहे. मोकळ्या जागेतील या देखण्या नाटय़गृहामुळे दक्षिण उपनगरातील प्रेक्षकांची व कलाकरांची मागणी पूर्ण झाल्याचे समाधान नागरिक व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)
 
नाटय़गृहाची वैशिष्टय़े
4सुमारे 86क् प्रेक्षकांची एकावेळी व्यवस्था
4अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक, सुशोभीकरण 
4 भव्य कलादान व विद्युतरोषणाई 
4 अभ्यासिका, कँटीन व व्हीआयपी कक्ष
4 भव्य व प्रशस्त वाहनतळ 
 
हाउसफुल्लचे फलक
4दक्षिण पुण्यात नव्याने सुरू झालेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक नाटय़गृहात दिवसातून तिन्ही वेळात कार्यक्रम होत आहेत. या भागातील रसिकांची भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने नाटय़गृहाबाहेर हाुसफुल्लचे फलक झळकत आहेत. 
 
स्वारगेट ते कात्रजर्पयत एकही सांस्कृतिक व नाटय़गृह नव्हते. त्यामुळे रसिक व कलाकारांनी सांस्कृतिक केंद्र उभारण्याची मागणी केली, त्या वेळी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तातडीने नाटय़गृहासाठी तरतूद करून ते साकारण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून समाधान वाटते.
- सुभाष जगताप, सभागृहनेते
 
अनेक वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रम व नाटके पाहण्यासाठी वाहतूककोंडीतून मार्ग काढत कोथरूड अथवा शिवाजीनगरला जावे लागत होते; परंतु पद्मावती येथे नव्याने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाटय़गृह व सांस्कृतिक केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळेच रसिक व नाटय़प्रेमींकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
- सतीश कुलकर्णी, रसिक, बिबवेवाडी.