शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पावणेचार कोटींचा चुराडा, तरीही स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 02:03 IST

शहरातील स्वच्छतागृहांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रशासन दर वर्षी तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करते;

पुणे : शहरातील स्वच्छतागृहांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रशासन दर वर्षी तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करते; परंतु आजही शहरातील बहुतेक सर्वच सार्वजनिक स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था झाली असून, दारे-खिडक्या तुटलेल्या, तर पाण्याची सुविधा नाही, प्लॅस्टिक, दारूच्या बाटल्यांमुळे टॉयलेट तुंबलेले, स्वच्छताच होत नसल्याने अतिशय दुर्गंधी अशी विदारक परिस्थिती असल्याचे ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीमध्ये समोर आले.स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था झाली असून, यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. यामुळे स्वच्छतागृह पाडून टाकण्यात यावीत, अशी मागणी खुद्द नगरसेवकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत टीम’च्या वतीने शहरातील कर्वे रोड, फर्ग्युसन रोड, खिलारे वाडी डेक्कन परिसर, सेनापती बापट रोड, टिळक रोड, पुलाची वाडी, महापालिका मुख्य इमारत परिसर आदी भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी करण्यात आली. यामध्ये स्वच्छतागृहांची विदारक वस्तुस्थिती समोर आली.> येथे केली पाहणीपुलाची वाडी येथे असलेल्या स्वच्छतागृहातील शौचालयामध्ये दारूच्या बाटल्या गुटख्याच्या पुड्या, प्लास्टिकच्या पिशव्या पडल्याने नागरिकांना स्वच्छतागृहाचा वापर करण्यास अडचण होत आहे. पुणे महानगरपालिका बिल्डिंगशेजारी शौचालयांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा वापर करण्यास त्रास होत आहे.शिवाजीनगर गावठाण येथील स्वच्छतागृहातील नळाची दुरवस्था झाल्याने पाण्याचे डबके साचले असून, डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे व नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलशेजारी स्वच्छतागृहाच्या बाहेर घाणीचे साम्राज्य साठले आहे. या स्वच्छतागृहातील पाणी हे उघड्यावर जाळीत येत आहे, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे व नागरिक धोका पत्करून या स्वच्छतागृहाचा वापर करीत आहे.कर्वे रस्ता (अभिनव चौक ते डेक्कन कॉर्नर) एकच मुतारी, पण तिचीही अवस्था खराब, खिलारे रोडवरील तीन स्वच्छतागृहांपैकी दोन यांना कुलूप, खिलारे रोडवर केवळ टॉयलेट, मुतारी नाही. अनेक ठिकाणी दरवाजे व्यवस्थितनाही.रानडे इन्स्टिट्यूटशेजारील इलेक्ट्रिक स्वछतागृह बंद, नेहमी पाण्याचा किंवा पॉवरचा अभाव, येथील मुतारीची दुरवस्था, सगळीकडेच पाण्याच्या कमतरतेमुळेदुर्गंधीचे प्रमाण जास्त, डेक्कन जिमखाना बसथांब्याजवळील स्वच्छतागृहाच्या वापरासाठी ५ रुपये शुल्क आकारले जाते; पण तरीही तेथील नळ व्यवस्थित नाहीत, खिडक्यांना संरक्षक जाळ्या नाहीत. चतुशृृंगी मंदिराजवळील स्वच्छता गृह, स्नानगृहाची अत्यंत दयनीय अवस्था, थुंकल्यामुळे सगळीकडे गलिच्छपणा अतिशय दुर्गंधी.काकासाहेब गाडगीळ पुलाजवळील शौचालय अनेक दिवसांपासून बंद आहे. परिसरातील लोकांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे. काही ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा अधिक टॉयलेट बंद.स्वच्छ सर्वेक्षण कागदावरचसध्या शहरात केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण करण्याचे काम ाुरू आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर दंड करण्याची कारवाई महापालिका प्रशासन करीत आहे. महापालिका प्रशासनाची जबाबदारी असलेल्या स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था झाली असताना, अतिशय गलिच्छ, दुर्गंधीयुक्त स्थिती असताना याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सध्या तरी महापालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण कागदावरच असल्याचे दिसते.आधुनिक मशिनद्वारे केली जाते स्वच्छताशहरातील स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी लाखो रुपये खर्च करून एक अत्याधुनिक ‘जेटिंग मशिन’ खरेदी करण्यात आली आहे. या मशिनद्वारे दिवसातून दोनवेळा शहरातील स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात येते.- ज्ञानेश्वर मोळक,घनकचरा विभागप्रमुख