शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत विटांनी ठेचून मित्रांनीच केला खून

By admin | Updated: March 17, 2016 03:04 IST

जवळच्या मित्रांनीच दारूच्या नशेत सिमेंटच्या विटांनी ठेचून एकाचा निर्घृणपणे खून केला. ही घटना १५ मार्चच्या रात्री ७ ते १० वाजण्याच्या सुमारास घडली. कदमवाकवस्ती (ता. हवेली)

लोणी काळभोर : जवळच्या मित्रांनीच दारूच्या नशेत सिमेंटच्या विटांनी ठेचून एकाचा निर्घृणपणे खून केला. ही घटना १५ मार्चच्या रात्री ७ ते १० वाजण्याच्या सुमारास घडली. कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एंजल हायस्कूलच्या मैदानालगत ही घटना घडली. मोहसीन मेहबूब तांबोळी (वय २६, लोणी काळभोर) असे मृत तरुणाचे नाव आहे. मद्य पिण्याच्या वादाचे पर्यवसान भांडणात झाल्याने हा प्रकार घडला असून गुन्हे शोध पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर बारा तासांच्या आत दोघांनाही ताब्यात घेतले आहे.मोहसीन याचे वडील मेहबूब गुलाब तांबोळी यांच्या फिर्यादीवरून प्रदीप सूर्यकांत काळभोर (वय २४) व सागर राजेंद्र कुंदेकर (वय २५, दोघेही लोणी स्टेशन) यांना ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याची कबुली दिली.घटनास्थळी मद्याच्या बाटल्या, सिगारेटची थोटके, प्लॅस्टिकचे ग्लास, शीतपेयाची बाटली मिळाल्याने मद्य प्राशन केल्यानंतर झालेल्या वादातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी होता. तसेच या जागेवर रक्ताचे थारोळे साचले होते व रक्ताने माखलेल्या सात सिमेंटच्या विटा मिळून आल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत.ते तिघेही चांगले मित्र असून वेळ मिळेल त्या वेळी ते एकत्र बसून मद्यपान करायचे. मंगळवारी (दि. १५) अतिमद्यपान झाल्यानंतर त्या तिघांत वाद झाला. याचे पर्यवसान भांडणात झाल्याने काळभोर व कुंदेकर या दोघांनी मोहसीन यास सिमेंटच्या विटांनी ठेचून ठार केले.(वार्ताहर)