शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांच्या गर्दीने भुशी धरण हाउसफुल्ल

By admin | Updated: July 28, 2014 04:37 IST

पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आज सकाळपासून पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण पर्यटकांनी हाउसफुल्ल झाले होते

लोणावळा : पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आज सकाळपासून पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण पर्यटकांनी हाउसफुल्ल झाले होते. पर्यटक, तसेच त्यांच्या वाहनांच्या गर्दीने राष्ट्रीय महामार्ग व भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर पाच ते सहा किमी अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील ही वाहतूककोडी सोडविण्यासाठी दुपारी २.३० ला राष्ट्रीय महामार्गावरून शहरात, तसेच धरणाकडे वाहनबंदी करण्यात आली होती.वर्षाविहारासाठी लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याने निर्माण होत असलेली वाहतूककोंडी शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. आजच्या पर्यटकांमध्ये पुणेकरांची संख्या प्रचंड होती. सकाळपासून दुपारी उशिरापर्यंत लोणावळ्यात येणाऱ्या सर्व लोकलगाड्या पर्यटकांनी भरून येत होत्या. यामुळे धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर पायी चालणाऱ्यांची अक्षरश: रांग लागली होती. लोणावळ्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्व धबधबे पर्यटकांनी गजबजले होते. सहारा पूल धबधबा व भुशी गावाजवळच्या धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी केली होती. भुशी धरणाप्रमाणेच लायन्स पॉइंट, खंडाळा येथील राजमाची गार्डन, भाजे लेणी परिसरातील धबधबा, दुधिवरे खिंडीतील धबधबा व कार्ला लेणी परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांच्या वतीने बंदोबस्त तैनात होता. मात्र, पर्यटकांच्या प्रचंड गर्दीसमोर पोलीसही हतबल झाले होते.(वार्ताहर)