मागील वर्षी याच दिवसांमध्ये कोरोनाची पहिली लाट आली होती. गेल्या ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये बाधितांची संख्या आणि मृत्युदर दोहोतही मोठी वाढ झाली होती. मध्ये चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोरोनाने उचल खाल्ली. मात्र, या वेळी कोरोनाची लस उपलब्ध झाली असून, लसीकरणही सुरू झाले आहे. लसीकरण आणि बाधितांची संख्या वाढणे याचा थेट संबंध नसला, तरी लसीकरणाच्या वेळी काळजी घेण्याची गरज आहे. अलीकडेच एका व्यक्तीला लस घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ताप आला. लसीकरणानंतर ताप येतोच म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, तो ताप करोना प्रादुर्भावाचा होता. अशीच आणखीही काही उदाहरणे आहेत. लसीकरण झाल्यानंतर लगेच तीन-चार दिवसांत कोरोना संसर्ग होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात लसीकरण केंद्र सुरु ठेवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
निरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी, सोशल डिस्टन्सचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST