शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धानोरी-कळसमध्ये दुपारनंतर वाढली मतदानासाठी गर्दी

By admin | Updated: February 22, 2017 03:13 IST

प्रभाग क्रमांक १ धानोरी-कळसमधील मतदान शांततेत पार पडले. धानोरीतील कै. बाबूराव माधवराव टिंगरे

पुणे : प्रभाग क्रमांक १ धानोरी-कळसमधील मतदान शांततेत पार पडले. धानोरीतील कै. बाबूराव माधवराव टिंगरे शाळेमध्ये सकाळच्या वेळेत तुरळक गर्दी होती. सकाळी या भागातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांनी मतदान करून कार्यालय गाठले. दुपारनंतर हळूहळू गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. एका बॅलेटवर दोन गट असल्याने अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अशा मतदारांना निवडणूक कर्मचारी माहिती देऊन मदत करीत होते. सर्व गटांतील उमेदवारांना मतदान केल्याशिवाय सायरन वाजत नसल्याने पहिल्या बॅलेटवरचे बटण दाबल्यानंतर आवाज येत नसल्याने आपले मतदान झाले नाही, असे अनेकांना वाटले. मुंजाबावस्तीतील नारायणराव ग्यानबा मोझे महाविद्यालयातही मतदान सुरळीत पार पडले. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावला. शाळेतील काही खोल्यांच्या काचा तुटलेल्या असल्याने, पुरेशी प्रकाशव्यवस्था व स्वच्छतागृहांची अवस्था बिकट असल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी माध्यम शाळेमध्ये छोट्या खोल्या असल्याने व दुपारनंतर उन्हाचा तडाखा वाढल्याने उष्णता जाणवत होती. या ठिकाणीही मतदान सुरळीत पार पडले.कळस भागातील मनपा शाळा क्र. १७० बी तसेच ट्रिनिटी हायस्कूलमध्येही शांततेत मतदान पार पडले. विश्रांतवाडीतील बॅ. विठ्ठलराव गाडगीळ प्राथमिक विद्यालयात दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. मतदानाची वेळ संपण्यासाठी काही तास उरले असल्याने नागरिकांनी या शाळेत गर्दी केली. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. वयोवृद्ध नागरिक व महिलांना या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागले. मतदान कुठल्या खोलीत आहे, याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसल्याने नागरिक इकडेतिकडे फिरताना दिसून आले. जिन्यातही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. गर्दीमुळे अनेक महिलांचा श्वासही कोंडला. पोलिसांनाही काही काळ गर्दीला सांभाळणे अवघड जात होते.