शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
4
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
5
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
7
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
8
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
9
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
10
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
11
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
12
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
13
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
15
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
16
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
17
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
18
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
19
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
20
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...

कोटय़वधींची वाहने सडताहेत

By admin | Updated: June 27, 2014 00:47 IST

चोर एखाद्याची दुचाकी पळवितो. ही दुचाकी वापरून एखादा गुन्हा करतो. पुढे कधीतरी तो सापडतो आणि गुन्ह्यात वापरली म्हणून ती दुचाकीही जप्त होते.

शिवप्रसाद डांगे ञ पिंपरी
चोर एखाद्याची दुचाकी पळवितो. ही दुचाकी वापरून एखादा गुन्हा करतो. पुढे कधीतरी तो सापडतो आणि गुन्ह्यात वापरली म्हणून ती दुचाकीही जप्त होते. चोर कोठडीत जातो, दुचाकी पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवली जाते. नंतर जामीन मिळून चोर बाहेर निघतो; पण दुचाकी मात्र वर्षानुवर्षे सडत पडते.. चोराला गाडीचे काही घेणोदेणो नसते आणि मूळ मालक मात्र न्यायालयीन निकालाच्या प्रतीक्षेत राहतो.
गाडीचा अपघात होतो. पोलीस गाडी उचलून आणतात. ठाण्याच्या आवारात गाडी लावून ठेवतात. पोलीस एक-दोन वेळा नोटीस पाठवतात; पण नको ते पोलिसी झंझट म्हणून मालक तिकडे फिरकतच नाही आणि गाडीचा प्रवास सडण्याकडे सुरू होतो.
 
अशा नानाविध कारणांनी आणलेल्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांचा अक्षरश: ढीग प्रत्येक पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस दिसतो. प्रत्येक गाडीवर धुळीची इतकी पुटं चढलेली आहेत की, ती उत्खननात सापडली असावी, असे वाटते. ऊन, वारा, पाऊस पडून पडून त्या गाडय़ा गंजल्या आहेत. यातील अनेक गाडय़ांचे सुटे भाग गायब झाल्याने केवळ सांगाडेच उरले आहेत. हा सारा सरकारी कारभाराचा परिणाम आहे.
ही वाहने न्यायालयीन प्रकरणांत अडकली असल्याने त्यावर कोणताही निर्णय घेणो अवघड जात आहे. मात्र,  या वाहनांमुळे ठाण्यातील जागेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय ही भंगार वाहने सांभाळणो पोलिसांसाठी डोकेदुखीचे ठरत  असून, ठाणो परिसरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत.
 
  शहरातील ठाण्यांमध्ये धूळखात 
पडून  असलेली ही वाहने सांभाळताना
पोलिसांची दमछाक होत आहे. भंगारावस्थेत गेलेल्या वाहनांच्या  ढिगा:यात गवत व कच:याचे प्रमाण वाढत आहे. त्या ठिकाणी वेळोवेळी साफसफाई करणो जिकिरीचे होते. डासांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया अशा आजारांची भीती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात टायर व इतर ठिकाणी पाणी साचत असल्याने ठाण्यात कार्यरत पोलिसांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ठाण्याच्या आजूबाजूच्या रहिवाशांनासुद्धा याचा त्रस सहन करावा लागत आहे.
 
4अनेक खटल्यांचा निकाल कित्येक वर्षानी लागतो. तोर्पयत ते वाहन मालकालाही ओळखू न येण्याच्या स्थितीत पोहोचते. दुरुस्ती खर्चाचा विचार करता मालक वाहन नेतच नाही. असे वाहन कायमचे ठाण्यात पडून राहते. एखादे नवीन वाहन पोलिसांनी जप्त केले, तर काही दिवसांतच त्या वाहनाचे   दरवाजा, स्टेपनी, स्पॅनर, टायर आदी सामान हमखास चोरीला जाते. त्यामुळे मालक वाहन सोडविण्याच्या फंदातच पडत नाही. एखादे वाहन उघडय़ावर कितीही दिवस उभे राहिले, तर त्याचे नुकसान होत नाही. मात्र, पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांची बिकट परिस्थिती होते. वाहनांच्या वस्तू चोरीला जातातच, असे एका जाणकाराने सांगितले. 
4एखादे वेळी वाहन घेण्यासाठी मालक पोलीस ठाण्यात येतो. तोर्पयत वाहनाचे बरेचसे सामान चोरीला गेलेले असते. ती व्यक्ती उभ्या असलेल्या वाहनाच्या वस्तू काढून स्वत:च्या वाहनाला लावून पोलिसांचे हात ओले करून निघून जाते. असेदेखील प्रकार घडतात. म्हणून तर अनेक दिवस वाहने सडलेल्या व गंजलेल्या अवस्थेत पहावयास मिळत आहेत.
 
शहरातील रस्त्यांवर दररोज शेकडो वाहनांची भर पडते. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघातांची संख्याही वाढली आहे. पोलीस अशी अपघातग्रस्त वाहने जप्त करून ठाण्याच्या आवारातच आणून ठेवतात. जप्त वाहने सोडवून नेण्यासाठी   कागदपत्रंची आवश्यकता असते. मात्र, ब:याचदा आरसीटीसी बूक नसणो, वाहनाचा वीमा नसणो, चालक-मालक भिन्न, हस्तांतरण न होणो अशा अनेक कारणांमुळे ठाण्यामधून किंवा न्यायालयातून वाहन सोडविणो कठीण बनते. अनेक वेळा वाहनाच्या किमतीपेक्षा पोलीस स्टेशन, न्यायालयीन खर्चच जास्त असतो. त्यामुळेही मालक वाहनाचा नाद  सोडून देतो. काही वेळा बेवारसपणाने वाहन सोडले जाते.
न्यायालयीन खटल्यातील वाहने निकाल लागल्याशिवाय नेता येत नाहीत. वर्षानुवर्षे तो लागत नाही. निकाल लागलाच तर वाहन 
पोलीस ठाण्यात गंजून गेलेले असते. त्यामुळे ते ताब्यात घेऊनसुद्धा फायदा नसतो. त्यामुळे अनेकदा वाहन तेथेच सोडून दिले जाते. 
शहरातील पोलीस ठाण्यांत मुळातच अपुरी जागा आहे. त्यातच या भंगार वाहनांनी जागा व्यापल्याने पोलिसांना त्यांची वाहने रस्त्यावर लावावी लागतात.   जागेअभावी जप्तीची वाहने अगदी खेटून 
लावली जातात. जुन्या वाहनांवर नवीन वाहने टाकली जातात. 
एखाद्या खटल्याचा निकाल लागला आणि वाहन परत देण्याचा आदेश मिळाला, तर अशी वाहने परत द्यावी लागतात. त्यामुळे ती  सांभाळावीच लागतात.  अनेक वाहनांचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे. तरी त्यांचा सांभाळ करावा लागत आहे. अशा वाहनांमध्ये दर महिन्याला वाढच होत आहे.