शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दुष्काळी पट्ट्यात फुलू लागली ऊसशेती

By admin | Updated: December 26, 2016 02:16 IST

पुरंदर तालुका कायमस्वरुपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प असते.

मामासाहेब गायकवाड / भुलेश्वरपुरंदर तालुका कायमस्वरुपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प असते. यामुळे येथील शेतीला ही तारेवरची कसरत आहे. पण गेली पाच वर्षे तालुक्यात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आले आणि पुरंदरची माळराने बागायती झाली. एवढेच नव्हे, तर चक्क बागायती जमिनीत मोठ्या प्रमाणात उसाच्या लागवडी झाल्या. यामुळे पुरंदरचा पूर्वपट्टा कायमस्वरुपी दुष्काळी असतानाच मात्र ऊसशेती फुलू लागली. पुरंदर तालुक्यात कायमस्वरुपी दुष्काळी असणारा पूर्वपट्टा पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून कायमस्वरुपी दुष्काळी ओळख पुसून बागायतदार झाला. पुण्याचे वापर केलेले पाणी मुळा-मुठा नदीमध्ये सोडून पंपाद्वारे उचलण्यात आले आहे. यामुळे पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू राहण्याला कोणत्याही धरणाची गरज नाही. यामुळे पुण्याला जेवढे जास्त पाणी मिळेल, तेवढे पाणी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला मिळते. यामुळे या योजनेला सहसा पाणी कमी पडत नाही. पुरंदर तालुक्यात अनेक गावे आठमाही बागायतदार आहेत. उर्वरित चार महिने दुसऱ्या तालुक्यातील गावात रोजंदारीशिवाय पर्याय नव्हता. मात्र पुरंदर उपसा जलसिंचन योजना तयार झाली आणि आठमाही बागायतदार असणारा तालुका बारमाही बागायतदार झाला. पुरंदर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, की राज्य शासन मोफत पाणी सोडते. यामुळे पुरंदर तालुक्यातील अनेक गावांतील पाण्यासाठीची चणचण दूर झाली. हे पाणी, ओढे, नाले, मोठमोठी तळी यामध्ये सोडल्याने तालुक्यातील पाण्याची पातळी वाढली. यामुळे अनेक विहिरी बारमाही पाण्याच्या झाल्या. टोमॅटो, वाटाणा, फुले या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेणे सुरू झाले. कायमस्वरूपी पाणी सुटणाऱ्या भागात आता तर चक्क उसाचे फड डोलू लागले आहेत. पुरंदर उपसा जलसिंचन योजना कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी सणसमळा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. आंबळे गावच्या हद्दीतून पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सोडण्यात येते. ते थेट सणसमळा म्हणजेच राजेवाडी तलावात येते. येथील शेतकरी वेळेवर पैसे भरून पाणी घेतात. पैसे भरण्याचे त्यांनी जवळपास वेळापत्रकच तयार केले आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांचे एकही पीक वाया जात नाही. पिकाला वेळेवर पाणी मिळत असल्याने फळे, फुले, विविध पिकाबरोबरच चक्क उसाची शेती फुलू लागली आहे.

ऊस सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व दौंड शुगर साखर कारखाना या ठिकाणी पाठविला जातो. यामुळे येथील शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. याकामी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे शाखा अभियंता साहेबराव भोसले यांची चांगलीच मदत होते. त्यांच्या योग्य नियोजनामुळे आज ही योजना सुरळीत चालू आहे. एकंदरीत पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्यामुळे उसाच्या क्षेत्रात नक्कीच वाढ झाली आहे.- रामदास सणस, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे लाभार्थी शेतकरी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी पुरंदर तालुक्यात आल्यामुळे येथील शेती बारमाही बागायतदार झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी उसाची शेती डोलू लागली आहे. सर्वसामान्य माणसांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. - गणेश ढोल, दौंड शुगर कृषी अधिकारी