शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

कर्ज काढून उत्सव करण्यावर टीका

By admin | Updated: June 24, 2017 06:08 IST

सोन्याचा नांगर फिरविलेल्या पुणे शहरावर कर्ज काढून गाढवाचा नांगर फिरवला जात आहे. कर्ज काढण्यासाठी लाखो रुपये खर्चून उत्सव साजरे करण्याच्या प्रकारावर

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सोन्याचा नांगर फिरविलेल्या पुणे शहरावर कर्ज काढून गाढवाचा नांगर फिरवला जात आहे. कर्ज काढण्यासाठी लाखो रुपये खर्चून उत्सव साजरे करण्याच्या प्रकारावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शुक्रवारी जोरदार टीका केली. महापालिकेच्या वतीने समान पाणीपुरवठा योजनेसाठी २३ कोटी रुपयांचे कर्जरोखे काढले जाणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून २०० कोटी रूपयांचे कर्जरोखे मुंबई शेअरबाजारातून महापालिकेने उभारले आहेत. या कर्ज काढण्याच्या कार्यक्रमासाठी पुणे शहरातून शेकडो अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबईला नेऊन उत्सव साजरा करण्याच्या प्रकरावरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.कर्जरोख्यांच्या कार्यक्रमासाठी भाजपा नगरसेवकांना मुंबईची सफर घडवून आणण्यात आली आहे. मात्र कर्जरोख्यांच्या नोंदणीसाठी वाजवलेली घंटा ही धोक्याची घंटा ठरणार आहे. कर्जरोखे काढण्याऐवजी पालिकेची देणी राज्य सरकार अद्याप का देत नाही, अशी टीका मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली. केंद्र व राज्याकडून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या अनुदानाची रक्कम मिळत नसताना कर्ज काढण्यासाठी लाखो रुपये खर्चून अभूतपूर्व कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. कर्जरोख्यांचे हे पैसे वापरण्याऐवजी महापालिकेची १४०० कोटींची शिल्लक वापरावी, अशी सूचना काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली. महापालिकेतील १५० अधिकाऱ्यांना मुंबईच्या कार्यक्रमासाठी का नेण्यात आले, त्याचा आदेश कुणी काढला याबाबत खुलासा करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी केली.