शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

सीबाची कामगिरीने गुन्हेगार हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST

शिरुर : महिलेचे डोळे काढून तिचा विनयभंग करण्याची करण्याच्या शिरुर मधील घटनेने खळबळ उडाली होती. त्यातील प्रमुख आरोपींचा मागमूस ...

शिरुर : महिलेचे डोळे काढून तिचा विनयभंग करण्याची करण्याच्या शिरुर मधील घटनेने खळबळ उडाली होती. त्यातील प्रमुख आरोपींचा मागमूस काढत पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोचविण्यात सिबाचा वाटा सिंहाचा ठरला. इतकेच नव्हे तर पुण्यातील अनेक दरोडे, खुन, घरफोड्यासारख्या अनेक गुन्हयांचा तपासासात गुन्हेगारांचे धागेदोरे शोधण्यात सिबाने चोख कामगिरी बजाविली. त्यामुळेच पोलिसांची ही सीबा सध्या पोलिस दलातील स्टार ठरली आहे. ही सीबा म्हणजे ना कोणी आयपीएस अधिकारी आहे ना कोणत्या पोलिस विभागातील कर्मचारी , तर सीबा ही पुणे पोलिसांच्या श्वान पथकातील डाॅबरमॅन जातीची अत्यंत हुशार श्वान आहे.

सीबाची हुंगण्याची व माग काढण्याची क्षमता खूपच चांगली असल्याने सध्या तीची पोलिस दलात जोरदार चर्चा सुरु आहे. तिचे प्रशिक्षक प्रशिक्षक पोलीस नाईक गणेश फापाळे यांनी तिच्याबदद्ल लोकमतला माहिती दिली. ते म्हणाले की, अंत्यत हुशार, चपळ अन गुन्हेगराचा माग काढण्यात तरबेज असलेल्या श्वान सिबा ही डॉबरमन जातीचे १वर्ष आठ महिनेचे श्वान एक वर्षेचे प्रशिक्षण घेतल्यानंतर पुणे ग्रामीण जिल्हा पोलीसाच्या श्वानपथकात दाखल झाली. गेल्या तीन महिन्यात या श्वानाने गंभीर गुन्हेयामध्ये गुन्हेगारचा माग शोधण्यात पोलीसना महत्त्वाची मदत केली.

सिबचा जन्म ५ जानेवारी २०१९ साली झाला ४५ दिवसाचं पिल्लू असताना या श्वानाला पोलीस दलात सोपवले गेले श्वानपथकाचे प्रमुख पोलीस नाईक गणेश फापाळे व पोलीस शिपाई बाबासाहेब चौधरी यांनी तिचे सहा महिने संगोपन केले त्यानंतर सुमारे वर्षभराचे प्रशिक्षणसाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं सीआयडी श्वानप्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर येथे पाठवण्यात आले. प्रशिक्षण कालावधीमध्ये तिने प्रत्येक परीक्षेत चणूक दाखवली तसेच १७ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०१९ मध्ये ट्रेनिंग कालावधीमध्ये ट्रनिग सेंटर मधून श्वान सिबाची प्रात्यक्षिक डेमोसाठी निवड करण्यात आली तिने कर्तव्य मेळाव्यामध्ये पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांच्यासमोर उत्कृष्ट पद्धतीने प्रात्यक्षिक करून दाखवले व या मेळ्यावमध्ये अपर पोलीस महासंचालक सीआयडी यांच्याकडून बक्षीसही पटकाविले. प्रशिक्षण कालावधीमध्ये ती अतिशय चाणाक्ष श्वान म्हणून ओळखले जाऊ लागले ट्रेनिंग सेंटर येथील पोलीस उपअधिक्षक नितीन लांडगे व पोलीस हवालदार जाकीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सिबा हिस प्रशिक्षण देण्यात आले .

दि. २९ जुलै २०२०मध्ये सिबा हिचे अंतिम परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून ती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील श्वानपथकात दाखल झाली. पुणे जिल्हा मोठा असल्याने खून, दरोडा, घरफोड्याचे तापसकामी श्वानपथक हे महत्त्वाचे काम करत अया तीन महिनेच्या कालावधी श्वान सिबा हिने हवेली येथिल एक खुनाच्या ठिकाणी चप्पलेचा माग वरून गुन्हेगारांचे घरचा मार्ग दाखवला.तसेच भिगवण येथे रोडरोबरी झाली असताना एका छोट्याशा कापडयाच्या फडक्यावरून फियादीच्या बॅगा व मोबाईल शोधून काढले व पुढे तीन किलोमीटर मार्ग काढला.तसेच शिरूर येथील गंभीर गुन्हयामध्ये देखिल श्वानाने चार ते पाच किलोमीटर मार्ग काढला . हे श्वान पथक स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागामध्ये कार्यरत आहे.

--

राणीची जागा घेतली सीबाने

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट व पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या देखरेखीखाली श्वानपथकाचे काम चालते. यापूर्वी देखील श्वान राणी हिने २० गंभीर गुन्हे उघडकीस आणले होते आणि श्वान राणीच्या जागेवरती आता श्वान सिबा ही देखील गुन्हा उघडकीस आणयास पोलीसाना मदत करत आहे.