शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगारांची टोळी पुण्यातून तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST

पुणे : लोणी काळभोर परिसरात दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी ...

पुणे : लोणी काळभोर परिसरात दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी तडीपार केले आहे.

प्रणव भारत शिरसाठ (वय २०, रा. लोणी स्टेशन), अभिजित अभिमन्यू आहेरकर (वय २०, रा. लोणी काळभोर) आणि सौरभ गोविंद इंगळे (वय २१, रा. इराणी वस्ती, लोणी स्टेशन, लोणी काळभोर) अशी तडीपार केलेल्या सराईत गुंडांची नावे आहेत.

सराईत गुन्हेगार प्रणव शिरसाठ हा आपल्या साथीदारांसह लोणी काळभोर गाव व परिसरात कोयता, कुर्हाड व इतर घातक शस्त्रेजवळ बाळगून नागरिक, व्यापारी व इतरांना धाक दाखवून प्रसंगी मारहाण करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने हप्ते वसुल करीत असतात. त्यांनी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती परिसर, लोणी स्टेशन परिसरात जबरदस्ती दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध नागरिक तक्रार करण्यास धजावत नाहीत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगार टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी या तिघांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना पाठविला. पाटील यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन प्रणव शिरसाट टोळीला पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे.

पोलीस निरीक्षक सुभाष काळे, उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस अंमलदार संदीप धनवटे, गणेश भापकर, मल्हार ढमढेरे यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यास सहाय्य केले.