शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

फटाके विक्रेत्यांची धावाधाव, न्यायालयाचा मनाई आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 07:00 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे फटाके विक्री बंद करावी लागल्याने हबकलेल्या किरकोळ फटाके विक्रेत्यांनी महापालिकेकडे धाव घेतली आहे.

पुणे : उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे फटाके विक्री बंद करावी लागल्याने हबकलेल्या किरकोळ फटाके विक्रेत्यांनी महापालिकेकडे धाव घेतली आहे. निवासी इमारती असलेल्या ठिकाणी पहिल्या मजल्यावरील दुकानांमध्ये फटाके विक्री करू देण्यास न्यायालयाने मनाई केली असल्याने महापालिकेने अशा व्यावसायिकांना परवानगी देण्यास नकार दिला आहे.शहरातील अशा ५० पेक्षा जास्त किरकोळ विक्रेत्यांनी गेले १५ दिवस महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे फटाके विक्री करू देण्याविषयीची परवानगी मागणारे अर्ज दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे अशी परवानगी देता येत नसल्याचे महापालिकेने त्यांना स्पष्ट केले आहे. शहरात अशा प्रकारे अनेक दुकानांमध्ये किरकोळ फटाके विक्री होत असते. मोठ्या दुकानांमध्ये जाणे ज्यांना शक्य होत नाही, लहान फटाकेच घ्यायचे असतात, त्यांच्यासाठी ही दुकाने फायदेशीर ठरतात, मात्र अशा विक्रीत अपघात होण्याचा धोका लक्षात घेऊन न्यायालयाने एका आदेशाने अशा किरकोळ विक्रीस व त्यातही निवासी क्षेत्रात मनाई केली आहे.गेली ५० वर्षे आम्ही याच पद्धतीने व्यवसाय करतो आहोत. एकदाही कसला अपघात झाला नाही. याही वर्षी नेहमीप्रमाणे फटाके दिवाळीच्या महिनाभर आधीच पैसे जमा करून आरक्षित केले होते. तो माल आता येऊ लागला आहे व आम्हाला परवानगी मिळत नाही, त्यामुळे बरेच नुकसान होत आहे अशी तक्रार त्यांनी महापालिका आयुक्त, उपायुक्त, अग्निशमन विभाग यांच्याकडे केली आहे. मात्र तिथे दाद मिळत नसल्यामुळे त्यांनी आता पदाधिकाºयांच्या भेटी सुरू केल्या आहेत. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांना याबाबतचे निवेदन शुक्रवारी दुपारी दिले.माल आता परत घेतला जाणार नाही, पैसे गुंतून पडले आहेत, तेही परत मिळणार नाहीत असे त्यांनी भिमाले यांना सांगितले. तसेच नागपूर महापालिकेने अशा प्रकारची परवानगी न्यायालयीन आदेशाचा सन्मान ठेवून दिली असल्याचे पत्रही त्यांनी भिमाले यांना दिले.

टॅग्स :Courtन्यायालयPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका