शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नारायणगावात महिला बिल्डरवर गुन्हा

By admin | Updated: March 21, 2017 05:04 IST

गृहप्रकल्पातील खरेदीखत व ब्रोशर (जाहिरातपत्रक) यामध्ये उल्लेख केलेल्या सोई-सुविधा न देता रो-हाऊस व फ्लॅटधारकांची

नारायणगाव : गृहप्रकल्पातील खरेदीखत व ब्रोशर (जाहिरातपत्रक) यामध्ये उल्लेख केलेल्या सोई-सुविधा न देता रो-हाऊस व फ्लॅटधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी नारायणगाव येथील आेंकार श्री डेव्हलपर्सच्या संध्या शैलेश औटी यांच्याविरुद्घ फसवणूक केल्याचा गुन्हा नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी़ वाय़ मुजावर व पोलीस उपनिरीक्षक हेमंत बंगाळे यांनी दिली आहे़नारायणगाव पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची फिर्याद लता राजेंद्र भोर (रा़ सनसिटी दरंदळेमळा, नारायणगाव, मूळ रा़ रांजणी, ता. जुन्नर, पुणे) यांनी दिली. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता भोर यांनी ओंकार श्री डेव्हलपर्स यांच्या बांधकाम साईटची जाहिरात पाहिली व त्यामार्फत बिल्डर संध्या औटी यांच्या हनुमान चौकातील ओंकार श्री डेव्हलपर्स कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता त्यांनी दरंदळेमळा येथील सर्व्हे नं़ ८२ मध्ये बांधत असलेल्या सनसिटी संकुल येथील बांधकाम साईटची माहिती दिली़ हा गृहप्रकल्प जागेचे मूळ मालक सुनील व राजेंद्र शिवाजीराव खेबडे यांच्याकडून विकसित करण्यासाठी घेतलेला आहे़ हा गृहप्रकल्प सनसिटी संकुल नावाने सुरू करण्यात आला़ सौ़ लता भोर यांनी सर्व सोई-सुविधा ऐकून दि़ १३/४/२०१५ रोजी रोहाऊसचे रजिस्टर खरेदी खत केले़ खरेदी खतात ठरल्यानुसार रक्कम अठरा लाख रुपये आऱ टी. जी़ एस़द्वारे व उर्वरित रक्कम दोन लाख अडुसष्ट हजार रोख स्वरूपात दिले़ पार्किंगसाठी वेगळे चार लाख रुपये दिले़ त्यानुसार भोर यांना आरएच २ या रोहाऊसचा ताबा देण्यात आला़ (वार्ताहर)