शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराचा गुन्हा सीबीआयकडे द्यावा : पंधारे

By admin | Updated: May 13, 2017 04:15 IST

पुणे येथील मुलांचे निरीक्षण बालगृहात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लहान मुलांवर केलेल्या अनैसर्गिक लैंगिक आत्याचारप्रकरणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : पुणे येथील मुलांचे निरीक्षण बालगृहात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लहान मुलांवर केलेल्या अनैसर्गिक लैंगिक आत्याचारप्रकरणी चार दिवसांपासून घोडेगावजवळील पळस्टीक्यातील बालकाश्रमात वेगवेगळ्या चौकशी समित्या व पुण्याहून पोलीस येत असून, त्यांच्या प्रश्नांमुळे मुलांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या चौकशी समित्यांकडून आरोपींवर कठोर कारवाई होण्याऐवजी हे प्रकरण मिटविण्यासाठी मुलांवर दबाव आणला जात आहे. यासाठी या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, अशी मागणी तक्रारदार व अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्राचे सचिव विलास पंधारे यांनी केली आहे.शिवाजीनगर येथे असलेल्या बालगृहातील १४ मुले २०१५मध्ये घोडेगावजवळील पळस्टीक येथे असलेल्या सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मंचर संचालित अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्रात दाखल झाले. तेव्हापासून ही मुले विक्षिप्तासारखी वागत होती. विलास पंधारे यांनी सप्टेंबर २०१६मध्ये यातील प्रत्येक मुलाला विश्वासात घेऊन विचारले असता जिल्हा परिविक्षा आणि अनुसंरक्षण संघटना संचालित मुलांचे निरीक्षण बालगृह पुणे येथील शिक्षक व कर्मचारी हे लैंगिक शोषण व छळ करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. येथील शिक्षक व कर्मचारी मुलांना शाळेच्या ई-लर्निंगच्या हॉलमध्ये अश्लील चित्रफीत दाखवत, तर काही शिक्षक मोबाईलवरील अश्लील चित्रफीत दखवून मुलांवर लैंगिक अत्याचार करीत होते, ही माहिती त्यांना मिळाली व हा सर्व प्रकार ऐकून धक्का बसला. विलास पंधारे यांनी याबाबत तेव्हा महिला व बाल कल्याण आयुक्त, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हाधिकारी पुणे यांना लेखी निवेदनाद्वारे हा प्रकार कळविला; मात्र त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. ै त्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले. पुणे येथील बालगृहातील शिक्षक, कर्मचारी मुलांना बळजबरीने अश्लील चित्रफीत दाखवून, त्यांना मारहाण दमदाटी करून त्यांच्याकडून सुधारगृहातील गटारे व संडास साफ करून घेत. मुलांना फूस लावून या मुलांवर लैंगिक व शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार दिली. घोडेगाव पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली व पुढील चौकशीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग केला.