शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

महापालिकेच्या विद्युत अभियंत्याविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 18:54 IST

मुंबई-बंगलोर हायवे सर्व्हिस रोड लगतच्या जॉगिंग ट्रॅकवर तो सायकल खेळत होता. यावेळी तेथील विजेच्या खांबाचा शॉक बसून तो जागेवरच मयत झाला होता.

ठळक मुद्देसंततधार पावसामुळे वीजेच्या खांबात वीज प्रवाह पसरल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांचे मत

पुणे : सायकल खेळत असताना विजेच्या खांबाचा शॉक लागून वारजे येथे एका बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वारजे पोलिसांनी महापालिकेच्या विद्युत अभियंत्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पृथ्वीराज विशाल चव्हाण (वय १२) असे मृत मुलाचे नाव आहे. १८ आॅगस्टला सकाळी सहाच्या सुमारास मुंबई-बंगलोर हायवे सर्व्हिस रोड लगतच्या जॉगिंग ट्रॅकवर तो सायकल खेळत होता. यावेळी तेथील विजेच्या खांबाचा शॉक बसून तो जागेवरच मयत झाला. यानंतर वारजे पोलिसांनी एमएसईबीच्या विद्युत निरीक्षकांना अहवाल पाठवला होता. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा खांब पुणे महापालिकेचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानूसार पुणे महापालिकेच्या विद्युत अभियंत्याच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पृथ्वीराज हा एका खासगी शाळेमध्ये सहावी इयत्तेत शिकत होता. शाळेला सुट्टी असल्याने तो सायकलींग करण्यासाठी घराबाहेर पडला होता. सायकलींग करताना त्याच्या सायकलचा धक्का रस्त्यावरील वीजेच्या खांबाला लागला. विजेच्या खांबात वीज प्रवाह असल्याने शॉक लागून तो जागेवरच कोसळला.आजूबाजूच्या नागरिकांनी त्याच्या घरच्यांना याची माहिती दिली. मात्र, तोवर त्याचा मृत्यू झाला होता. संततधार पावसामुळे वीजेच्या खांबात वीज प्रवाह पसरल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांचे मत आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जी. बी. माने करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाmahavitaranमहावितरण