शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोरवाडीतील डॉक्टरांवर गुन्हा

By admin | Updated: December 22, 2016 01:55 IST

डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा दाखविल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोरवाडीतील न्यू लाईफ केअर रुग्णालयाच्या

पिंपरी : डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा दाखविल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोरवाडीतील न्यू लाईफ केअर रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबाना मौलाना सय्यद (वय ४५, रा. कासारवाडी) असे मृत रुग्णाचे नाव आहे. उपचारात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये डॉ. अन्सारी, डॉ. भालेराव, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राकेश सावंत आणि डॉ. शाहरुख पठाण यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबाना यांचे पती मौलाना सय्यद (वय ५०) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ४ मे रोजी छातीत आलेल्या गाठीवर उपचार करण्यासाठी शबाना यांना मोरवाडीतील लाइफ केअर रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना ५ मे रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. त्या वेळी भोसरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे पती मौलाना सय्यद हे सोलापूर येथे रेल्वे लोहमार्ग पोलीस निरीक्षक आहेत. त्यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला. पोलिसांमार्फत मेडिकल बोर्डाकडे उपचाराची कागदपत्रे पाठविली. त्या कागदपत्रांच्या आधारे बोर्डाने डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा अभिप्राय दिला.त्यानुसार डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे भोसरी पोलिसांनी सांगितले.(प्रतिनिधी)