शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना शहरप्रमुखावर गुन्हा

By admin | Updated: May 27, 2017 01:16 IST

शिवसेनेचे कुरवंडेगावचे माजी सरपंच संजय दिलीप भोईर यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेनेचे लोणावळा शहरप्रमुख राहुल शेट्टी यांच्यासह तीन जणांवर

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : शिवसेनेचे कुरवंडेगावचे माजी सरपंच संजय दिलीप भोईर यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेनेचे लोणावळा शहरप्रमुख राहुल शेट्टी यांच्यासह तीन जणांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास टाटा धरणासमोरच्या सहारा पुलाजवळ ही घटना घडली.याप्रकरणी संजय भोईर यांच्या फिर्यादीवरून शिवसेना शहरप्रमुख राहुल उमेश शेट्टी (रा. जयचंद चौक, लोणावळा), माजी नगरसेवक गणेश इरले (रा. जुना खंडाळा, लोणावळा) व गणेश नारायण हुंडारे (रा. रायवुड, लोणावळा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भोईर यांना शहरप्रमुख बनविण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने शेट्टी व भोईर यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामधून शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी दमदाटी केली असल्याचे भोईर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.गुरुवारी दुपारी शेट्टीसमर्थक हुंडारे यांनी त्यांना फोनवरून धमकी दिली होती. सायंकाळी ते गाडी वॉशिंग करण्यासाठी भुशी गावात गेले असताना पुन्हा हुंडारे याने फोन करून भेटायचे आहे, असे सांगितले. तेव्हा जयचंद चौकात भेटण्याचे ठरलेले असताना हुंडारे व इरले यांनी भुशी गावाच्या काही अंतरापासून भोईर यांच्या गाडीचा दुचाकीवरुन पाठलाग करीत सहारा पुलावर गाडी अडवली व तुला आज संपवतो म्हणत गाडीतून ओढत ओढत पुलाच्या खाली घेऊन गेले. तेथे इरले याने हात पाठीमागे पकडले व हुंडारे याने पाठीला खोचलेल्या चॉपरसारख्या हत्याराने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भोईर हे इरलेच्या हाताला हिसका देऊन पळाल्याने त्यांचा जीव वाचला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तिन्ही जणांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आय. जे. शेख तपास करीत आहेत.