शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे शाखेकडून हवाला रॅकेटचा पर्दाफाश;दोन कोटी पेक्षा अधिक रोकड हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:28 IST

पुणेः शिवाजी रस्त्यालगतच्या दोन इमारतीवर छापा टाकून हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला. गुन्हे शाखा युनिट-४ व स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे ही ...

पुणेः शिवाजी रस्त्यालगतच्या दोन इमारतीवर छापा टाकून हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला. गुन्हे शाखा युनिट-४ व स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यामध्ये दोन कोटी पेक्षा अधिक रोकड जप्त केली असून, रात्री उशीरापर्यंत त्याची मोजणी सुरू होती. राज्यात बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थ गुटखाच्या बेकायदेशीर विक्रीतून मिळालेली ही रोकड असल्याचे समजते. यात हवाल्याच्या व्यवहारातील बडे मासे गळाला लागली असल्याची माहिती कळते आहे.

याप्रकरणी, पोलिसांनी आठ ते नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबात रात्री उशीरापर्यंत फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे हे रॅकेट परिमंडळ पोलिस उपायुक्त १ फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चालवले जात होते.

पोलिस उपायुक्त प्रियंका नरनवरे, युनिट चार चे पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल आणि सहाय्यक निरीक्षक अभिजित चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. येथील मंत्री किशोर आर्केड व गणेश कृपा बिल्डींग शनिवारपेठ या दोन इमारतीवर छापा टाकून आठ ते नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना माहिती मिळाल्यावर कारवाईचे आदेश दिले होते. उपायुक्त नरनवरे यांनी सांगितले की, ही पुणे शहर गुन्हे शाखा आणि परिमंडळ एकच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. आम्हाला अशी माहिती मिळाली की, या रॅकेटमागील काही माणसे बेकायदेशीरपणे रोख रकमेचा संग्रह करत होती. ही रोकड ते एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी बेकायदापणे पोहचवत होते. हवाला रॅकेट गुटखाच्या बेकायदेशीर पुरवठादारांशी जोडला गेला होता. आम्ही एकाच वेळी चार कार्यालयांवर छापे टाकले आणि नऊ जणांना ताब्यात घेतले.

दरम्यान, गुटख्याच्या अवैध व्यापारातून रोख रकमेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. हा पैसा पुण्याहून हवाला रॅकेटमार्गे अन्य शहरात हलविण्यात येत होता. रॅकेटची यंत्रणा संपूर्ण शहर आणि जिल्ह्यात पसरली आहे. रोकड पैशाचा माग कुठून निघाला आहे याची पोलिस चौकशी करीत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी बऱ्याच लोकांचा समावेश असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे.