शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वकिलावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा, जातिवाचक शिवीगाळ प्रकरण : पूर्वीच्या भांडणाचा राग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:50 IST

पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात ठेवून गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका वकिलाविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात ठेवून गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका वकिलाविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाणेर येथील नदीपात्रातील विसर्जन घाटात रविवारी रात्री पावणेदहा वाजता हा प्रकार घडला.अजय उत्तम फासगे (वय २९, रा. कळमकर चाळ, बाणेरगाव) यांनी याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अ‍ॅड. आशिष ताम्हाणे (रा. बाणेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून फासगे पाषाणमधील एका गॅस एजन्सीमध्ये डिलिव्हरीबॉय म्हणून काम करतो. यापूूर्वी तो एका नगरसेवकाकडे चालक म्हणून काम करत होता. त्या वेळी या नगरसेवकाच्या कुटुंबातल्या सदस्यांची आणि अ‍ॅड. ताम्हाणे याची काही कारणावरून भांडणे झाली होती. त्या वेळी ताम्हाणे याने फिर्याद देऊन फासगे याला गुन्ह्यामध्ये अडकवून कारागृहात पाठवले.तसेच, ताम्हाणे याच्या गुंडांनीदेखील फासगेला दोन वेळा मारहाण केली होती. घाबरून त्यांनी तक्रार न देता कालांतराने या नगरसेवकाकडील कामदेखील सोडले होते, असे फासगे याने जबाबात म्हटले आहे. फासगे हा त्याचा मित्र दिगंबर चव्हाण याच्यासोबत रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नदीकाठी गणेश विसर्जन करण्यासाठी गेला होता.गणेश विसर्जन करून परतत असताना ताम्हाणेदेखील त्याच्या मंडळाचा गणपती विसर्जन करून परत चालला होता. दोघे समोरासमोर आले. त्या वेळी ताम्हाणे याने फासगे याला घाणेरड्या शब्दांत शिवीगाळ करून, तुला महिन्याभरात जिवंत ठेवणार नाही, म्हणून तुझी काय लायकी आहे. तुम्ही जास्त उड्या मारू नका, तुला व तुमच्या घरच्यांना कुठे पाठवतो ते कळणार पण नाही. तसेच जातीचा उल्लेख करून तुमची भीक मागून खाण्याची लायकी आहे. तुला दोन वेळा जिवंत सोडलाय, पण आता तिसºयांदा कोणीही मध्ये येऊ दे घाबरणार नाही. तुला चांगलीच अद्दल घडवतो, असे म्हणून खुनाची धमकी दिल्याचे फासगे याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.