शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक साईनाथ बाबरसह मनसेच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात जबरदस्तीने शिरून सहायक कार्यालयात सर्वत्र ओला-सुका कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात जबरदस्तीने शिरून सहायक कार्यालयात सर्वत्र ओला-सुका कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणाऱ्या मनसे नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वत: नगरसेवक असतानाही बाबर यांनी तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टंन्सिंगचे नियम न पाळल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्याखालीही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सहायक आयुक्त किशोरी शिंदे यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार वानवडी क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला होता. सहायक आयुक्त किशोरी शिंदे या दिल्लीतील पथकासोबत कार्यालयाचे कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रभागांतील स्वच्छ सर्वेक्षण योजनेची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. याची साईनाथ बाबर यांनी गोरख इंगळे याच्याकरवी फोन करून माहिती घेतली. शिंदे या कार्यालयात नाहीत, हे लक्षात आल्यावर बाबर, इंगळे व त्यांचे १० ते १५ कार्यकर्ते महापालिकेने घातलेले निर्बंध न पाळता कार्यालयात शिरले. त्यावेळी उपअभियंता बागडे व प्रभारी अधीक्षक पांडुरंग लोहकरे यांनी त्यांच्याकडे काय काम आहे, अशी विचार केली. तरीही ते जबरदस्तीने शिंदे यांच्या केबिनमध्ये घुसले. कार्यालयात सोबत आणलेला ओला, सुका व कुजलेला कचरा टाकला. पुन्हा कार्यालयातील संपूर्ण लॉबीमध्ये देखील कचरा टाकून घाण केली. तसेच कार्यालयातील इतर सहकार्‍यांच्या टेबलवर व कार्यालयातील कागदपत्रे व फाईलींवर कचरा टाकून काम करण्यास अडथळा आणला. कोविड १९चे कोणत्याही नियमांचे पालन न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.