इंदापूर : पळसदेव (ता. इंदापूर) येथे व्हॉट्स अॅपवर बदनामीकारक मजकूर टाकल्याच्या आरोपावरून दोघा जणाविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ९) गुन्हा दाखल करण्यात आला.अंजुमन हारुन शेख, सादिक हारुन शेख (दोघे रा. पळसदेव) अशी आरोपींची नावे आहेत. सविस्तर माहिती अशी की, पळसदेव येथे दोन समाज शेजारी शेजारी राहतात. कचरा टाकण्यावरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी समाजाची बदनामी होईल, असा मजकूर टाकला.याविरोधात कार्यकर्ते विलास शिंदे, संजय शिंदे, भीमराव आहेर व इतरांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. तहसील कार्यालय, इंदापूर पोलीस ठाणे येथे तक्रारीचे निवेदन दिले. आरोपींवर कारवाईची मागणी केली. त्यांच्या या मागणीस सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग शिंदे, महादेव लोंढे, लक्ष्मण देवकाते यांनी पाठिंबा दिला. याची दखल घेत पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. आरोपींना ताब्यात घेतले.(वार्ताहर)
बदनामीप्रकरणी दोघांवर गुन्हा
By admin | Updated: January 11, 2017 02:00 IST