शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गोपाळ महार समाधी छताची तोडफोड सरपंचासह ४९ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 05:15 IST

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील गोपाळ गोविंद महार यांच्या समाधीच्या माहितीचा फलक व छताची तोडफोड केल्याप्रकरणी सरपंच, उपसरपंचांसह ४९ जणांवर अ‍ॅट्रॅसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव भीमा (जि. पुणे) : वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील गोपाळ गोविंद महार यांच्या समाधीच्या माहितीचा फलक व छताची तोडफोड केल्याप्रकरणी सरपंच, उपसरपंचांसह ४९ जणांवर अ‍ॅट्रॅसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावामध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी घटनास्थळी भेट देऊन हस्तक्षेप केला.शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमा सुभाष ओव्हाळ (रा. वढू बुद्रूक ता. शिरुर) यांनी फिर्याद दिली आहे. सकाळी गावातील काही युवकांनी गोपाळ गोविंद महार यांच्या समाधीस्थळाकडे जाणारा फलक काढून टाकत समाधीवरील छताची तोडफोड केली. स्थानिक बौद्ध समाजाने तत्काळ आक्षेप नोंदवले. त्यानंतर दोन्ही समाजात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दंगल नियंत्रण पथकही या वेळी हजर झाले. हक यांनी दोन्ही गटांशी स्वतंत्र चर्चा करुन गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रकरण नियंत्रणात आले. या प्रकरणी पुढील बैठक ४ जानेवारीला होणार आहे.