शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘सिंहगड’च्या मारुती नवलेंवर अपहाराचा गुन्हा

By admin | Updated: February 24, 2016 03:38 IST

कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्यनिर्वाह निधीचे पैसे कापून घेऊन ते कार्यालयात न भरता ३ कोटी ३८ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष

पुणे : कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्यनिर्वाह निधीचे पैसे कापून घेऊन ते कार्यालयात न भरता ३ कोटी ३८ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मारुती नवले यांच्यासह दोघांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे़ त्याचबरोबर, संस्थेचा शेअर म्हणून भरावयाची ९ कोटी २७ लाख रुपयांची रक्कमही भविष्यनिर्वाह निधीत त्यांनी जमा केली नाही. नवले यांच्यासोबत सिंहगड इन्स्टिट्यूटचे कर्मचारी प्रकाश लोखंडे (रा़ अश्विनी सोसायटी) यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भविष्यनिर्वाह निधी संगठण कार्यालयाचे निरीक्षक अविनाश पात्रा (वय ४५, रा़ वडगाव धायरी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी या एरंडवणे येथील संस्थेत ४ हजारांहून अधिक कर्मचारी काम करीत असून, त्यांच्या भविष्यनिवार्ह निधीची रक्कम एरंडवणे कार्यालयातून भरणा केली जाते़ या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्यनिवार्ह निधीची रक्कम कापूनही संस्थेने मे २०१५पासून तिचा भरणा केला नाही़ भविष्यनिवार्ह निधीच्या सहायक आयुक्तांकडून आदेश मिळाल्यानंतर २७ जानेवारी २०१६ रोजी पात्रा यांनी सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयाला भेट दिली़ तेथील अधिकारी प्रकाश लोखंडे यांच्याकडील कागदपत्रे पाहिली़ त्यात सॅलरी स्टेटमेंट व इतर कागदपत्रांची तपासणी केली़सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीतील कामगारांच्या भविष्यनिवार्ह निधीची रक्कम कापून घेऊन कामगारांचे वेतन खाते असलेल्या चिंचवडमधील आनंद को-आॅप़ बँक खात्यात जमा असल्याचे आढळून आले आहे़ याबाबत भविष्य निधीची रक्कम जमा का केली नाही, अशी लेखी नोटीस दिल्यानंतरही त्यांनी कामगारांच्या भविष्य निधीची तसेच कंपनीच्या शेअरची रक्कम भरली नाही़ त्यामुळे भविष्यनिवार्ह निधी कार्यालयातर्फे अविनाश पात्रा यांनी मंगळवारी डेक्कन पोलीस ठाण्यात ३ कोटी ३८ लाख १ हजार ८ रुपयांची रक्कम जमा न करता परस्पर अपहार केल्याबद्दल फिर्याद दिली आहे़ मारुती नवले व प्रकाश लोखंडे यांच्याविरुद्ध डेक्कन पोलिसांनी कलम ४०६ खाली गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक सुचेता खोकले तपास करीत आहेत़मे २०१५ ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत कामगारांच्या भविष्यनिवार्ह निधीची रक्कम ३ कोटी ३८ लाख १ हजार ८ रुपये व मालकाचे शेअर आॅक्टोबर २०१४ ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीतील ९ कोटी २७ लाख ९४ हजार ५५१ रुपये भविष्य निधी संगठन कार्यालयाकडे जमा केले नसल्याचे आढळून आले़