पुणे : बांधकाम कामगारांना बांधकामाच्या जागेवर भिंतीच्या आसऱ्याला राहावे लागते. क्रेडाईच्या व्यावसायिकांनी त्यांना सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे मत क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी व्यक्त केले.
क्रेडाई पुणे मेट्रोच्या कुशल या उपक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट सुविधा पुरस्कार या स्पर्धेचे आयोजन केले होते. सतीश मगर यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
याप्रसंगी क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट, उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे, स्पर्धेचे संयोजक किशोर पाटे, कुशल उपक्रमाचे प्रमुख आणि क्रेडाईच्या कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, सदस्य मिलिंद तलाठी, समीर बेलवलकर, कपिल त्रिमल, सपना राठी, अभिजीत अचलारे, कवीश ठकवाणी उपस्थित होते.
चौकट
गोदरेज प्रॉपर्टीज, विराज आय प्रोजेक्ट्सला प्रथम क्रमांकाचा मान
कामगारांची राहण्याची व्यवस्थेसाठी बांधकाम विकासक या विभागात ३०० हून अधिक कामगार असलेल्या श्रेणी ३ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लि., श्रेणी २ मध्ये प्राइड पर्पल ग्रुप, तर श्रेणी १ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लि. आणि बांधकाम विकासक व कंत्राटदार या विभागात श्रेणी ३ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लि. व मिलेनिअम इंजिनीअर्स अँड काँट्रॅक्टर्स प्रा.लि., श्रेणी २ मध्ये प्राइड पर्पल ग्रुप व बिल्डक्यू कन्स्ट्रक्शन प्रा. लि., श्रेणी १ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीज व विराज आय प्रोजेक्ट्स यांना सर्वोत्कृष्ट सुविधा पुरस्कार प्रदान करून प्रथम क्रमांकाने गौरविले.
पंचशील रिॲल्टी व पेगासस प्रॉपर्टीजचा गौरव
विशेष पारितोषिक विभागात कामगारांचे सर्वाधिक बीओसीडब्ल्यू नोंदणी करणाऱ्या पंचशील रिॲल्टी व पेगासस प्रॉपर्टीज या दोघांना प्रथम पारितोषिक प्रदान केले. सर्वोत्कृष्ट स्वच्छतेसाठी गोदरेज प्रॉपर्टीज यांना प्रथम आणि रोहन बिल्डर्स यांना द्वितीय पारितोषिक प्रदान करून सन्मानित केले. सुरक्षा व स्वच्छता प्रकारात रोहन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण सुविधा प्रकारात फरांदे स्पेसेस, सर्वोत्कृष्ट नवसंकल्पनेसाठी वॅसकॉन इंजिनीअर्स यांना तर सर्वोत्कृष्ट सुविधेसाठी कोलते पाटील लि. यांना सन्मानित करण्यात आले.