शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

सर्जनशीलता स्त्रीची शक्ती

By admin | Updated: October 13, 2015 01:28 IST

सर्जनशीलता ही स्त्रीची शक्ती आहे. महिलांकडे जास्त क्षमता असते, त्या ती योग्यरीतीने वापरतातही; मात्र त्यासाठी त्यांना कुटुंबाकडून आणि समाजाकडून योग्यरीतीने मानसिक बळ मिळणे आवश्यक असते

पुणे : सर्जनशीलता ही स्त्रीची शक्ती आहे. महिलांकडे जास्त क्षमता असते, त्या ती योग्यरीतीने वापरतातही; मात्र त्यासाठी त्यांना कुटुंबाकडून आणि समाजाकडून योग्यरीतीने मानसिक बळ मिळणे आवश्यक असते, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील महिलांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर व्यक्त केले.नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘स्त्रीशक्तीचा जागर’ या संकल्पनेअंतर्गत डॉक्टर महिलांनी ‘लोकमत’ला भेट दिली. या वेळी वैद्यकीय क्षेत्रातील आव्हानांचा वेध घेण्यता आला. महिला म्हणून या क्षेत्रात स्थान निर्माण करत असताना त्यांच्यापुढे असणारी आव्हाने आणि त्याचा सामना करताना त्यांची होणारी ओढाताण याविषयी डॉक्टरांनी आपले अनुभव या वेळी मांडले. डॉ. स्वाती भावे म्हणाल्या, लहानपणापासूनच मुलींना मुलांसारखी वागणूक देणे चुकीचे आहे. समानता असली तरीही मुलीला काही गोष्टी येणे भाग आहे. ही मानसिकता बदलत असल्याने अनेक समस्या उद्भवतात. पालकांनी चांगले संस्कार केल्यास मुलगी ही उत्तम गृहिणी आणि त्यानंतर एखाद्या करिअरमध्ये स्वत:चे नाव कमवू शकते हे विसरता कामा नये. पुरुष घरातील कामात मदत करतात; परंतु त्यांंची जबाबदारी घेण्याची तयारी नसते. हे चित्र बदलल्यास महिला स्वत:ला जास्त चांगल्या पद्धतीने सिद्ध करूशकतील. स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने पुढे जात असल्या तरीही मानसिकरीत्या स्त्रिया आजही खंबीर नाहीत. त्यामुळे त्यांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे समतोल राखत महिलेने काम करण्याची आवश्यकता आहे. - डॉ. हिमानी कुलकर्णी मानसोपचारतज्ज्ञ १९७०च्या दरम्यान पदवी घेऊन बाहेर पडले असताना रुग्ण महिलांची परिस्थिती गंभीर असायची. आता वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिकतेमुळे यात बऱ्याच प्रमाणात सुधारणा झाली आहे. असे असले तरी महिला स्वत:च्या आरोग्याकडे अजिबातच लक्ष देत नाहीत, ही वस्तुस्थिती आजही आहे. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक महिला आजच्या आधुनिक काळातही स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकत नाहीत, ही शोकांतिका आहे. असे होण्यामागे एका दृष्टिकोनातून महिलाच जबाबदार आहे.- डॉ. सविता मेहेंदळे, स्त्रीरोगतज्ज्ञ आपल्या समाजात आजही मोठ्या प्रमाणात लिंगभेद असल्याचे चित्र आहे. एखाद्या संघटनेच्या पदाधिकारी पदावर जाण्यासाठी महिलेला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागते. तसेच पदावर गेल्यावरही पुरुषांच्या अहंकाराचा सामना करावा लागतो. महिला कुटुंब संभाळत असताना पदावर काम करू शकणार नाही असाच अनेकदा दृष्टिकोन असतो. मात्र महिलांनी स्वत:च्या क्षमतांवर ठाम राहात आत्मविश्वासाने हा लढा द्यायला हवा. - डॉ. स्वाती भावे बालरोगतज्ज्ञ