शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वास्तवदर्शी आराखडा तयार करा

By admin | Updated: May 30, 2017 03:27 IST

शहरातील कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयार केलेला आराखडा सद्यस्थितीला धरून नाही. अधिकाऱ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरातील कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयार केलेला आराखडा सद्यस्थितीला धरून नाही. अधिकाऱ्यांना कचरा प्रश्नाचे गांर्भीय नाही, नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी कोणताही प्रयत्न करत नाहीत. तातडीने उपाययोजना व दीर्घकालीन योजनांचा आराखडा वास्तवदर्शी नाही, कोट्यवधी रुपये देऊनदेखील निधीचा योग्य वापर होत नाही, अशा कडक शब्दांत आमदार, खासदारांनी कचरा प्रश्नावर महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शहराच्या कचरा प्रश्नावर तयार करण्यात आलेला आराखडा प्रशासनाने आमदार आणि खासदार यांच्यापुढे सादर केला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, राज्यमंत्री विजय शिवतरे, खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार शरद रणपिसे, नीलम गोऱ्हे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, अ‍ॅड. जयदेव गायकवाड, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. या बैठकीत प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यात क्षमता वाढविण्यासाठी अपेक्षित उपाययोजना केलेल्या नाहीत, प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणात निधी देऊन देखील तो योग्य प्रकारे खर्च केला जात नाही, लोकप्रतिनिधी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते, याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच या बैठकीत कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी वाहनाची संख्या वाढविण्यासाठी आमदार, खासदारांनी आपल्या निधीतून काही पैसे देणे, कचऱ्याचे वर्गीकरणावर अधिक भर देणे, कलेक्शन सिस्टिम स्ट्राँग करणे, शंभरपेक्षा अधिक फ्लॅट असलेल्या सोसायट्यांमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करणे, हद्दीलगतच्या गावांमधील कचरा येऊ नय, यासाठी सुरक्षा पोस्ट निर्माण करणे व नागरिकांचा सहभाग वाढवावा, याबाबत जनजागृती करा अशा सूचना आमदार, खासदारांनी यावेळी केल्या.महापौर करणार दौराकचरा आराखड्याबाबत नागरिकांची मते समजून घेण्यासाठी महापौर मुक्ता टिळक ३०, ३१ आणि १ जून रोजी प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यालयांचा दौरा करणार आहे. यामध्ये महापालिका अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयसेवी संस्थाचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांच्याची चर्चा करणार आहेत. त्यानंतर लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सूचना, अभिप्राय यावर चर्चा करून व आराखड्यात योग्य तो बदल करून अंतिम आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.उशिराने नाराजीशहराच्या अत्यंत गंभीर अशा कचरा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी १० वाजता महापालिकेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु या बैठकीसाठी आयुक्त कुणाल कुमार बैठक सुरू झाल्यानंतर अर्धा तास उशीरा आले. यामुळे उपस्थित आमदारांनी बैठकीमध्येच तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आयुक्तांना कचरा प्रश्नासाठी वेळ आहे का, असा सवाल एका आमदाराने उपस्थित केला.