लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास मुंबईकडे जाणा-या एका क्रेनची शिडी घसरुन कारवर पडल्याने एक जण जागीच ठार झाला़ हा अपघात पाहण्यासाठी एका कार चालकाने गाडीचा ब्रेक मारल्याने सुमारे ७ ते ८ गाड्या एकमेकावर आदळून येथे विचित्र अपघात झाल्याने खंडाळा घाटात काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती़पंधरवड्यापासून खंडाळ्यातील अमृतांजन पुलाजवळ दररोज अपघात व वाहतुक कोंडी होत असल्याने अमृतांजनची ही डोकेदुखी थांबणार तरी केव्हा? असा प्रश्न उपस्थित होत असून यावर महाराष्ट्र शासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी प्रवाश्यांनी केली आहे़ (प्रतिनिधी)
अमृतांजन पुलाजवळ क्रेनची शिडी कारवर पडून एक ठार
By admin | Updated: January 17, 2015 00:04 IST