शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फसवून अर्ज घेतला माघारी?

By admin | Updated: February 8, 2017 03:03 IST

उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने चिंचवडमधील ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक कार्यालयात गर्दी झाली होती

चिंचवड : उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने चिंचवडमधील ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक कार्यालयात गर्दी झाली होती. शेवटच्या क्षणात प्रभाग क्रमांक १९ मधील एका महिला उमेदवाराने अर्ज माघारीसाठी धावपळ करीत अर्ज मागे घेतला; मात्र काही वेळानंतर आपल्याला फसवून अर्ज मागे घेतल्याची आरडाओरड सुरू केल्याने कार्यालया बाहेर गोंधळ सुरू झाला.दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत होती. अर्धा तास बाकी असताना निवडणूक कार्यालयातून या बाबत सूचना देण्यात येत होत्या. वेळ संपण्यासाठी पाच मिनिटे बाकी असताना निवडणूक निर्णय अधिकारी रूपाली आवले यांनी कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर कोणी अर्ज माघार घेण्यासाठी येत असतील, तर आत यावे अशा सूचना दिल्या. या वेळी काही उमेदवार व कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित होते. अधिकारी पुन्हा कार्यालयात जाताच एक कार्यकर्ता व महिला उमेदवार अधिकाऱ्याच्या दालनात गेले व उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून बाहेर आले. यानंतर कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. मात्र काही वेळातच या महिला उमेदवाराचे काही कार्यकर्ते व महिला समर्थक कार्यालया बाहेर जमा झाले. या वेळी या महिला उमेदवाराने आपल्याला फसवून आणल्याचे सांगत गोंधळ सुरु केला. मी घरात जेवत असताना माझा अर्ज बाद होणार असल्याने, मला त्वरित कार्यालयात बोलाविले असल्याचे एका व्यक्तीने सांगितले. तुमचे पती कार्यालयात बसले आहेत. तुम्ही लवकर चला, असे सांगून मला कार्यालयात सही करण्यासाठी घेऊन आल्याचा कांगावा केला. यामुळे काही काळ कार्यालयाबाहेर गोंधळ सुरु होता. माझी फसवणूक केल्याचे ही उमेदवार सांगत होती.(वार्ताहर)