शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या स्थायी आदेशावर न्यायालयाची मोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:12 IST

पीएमटी व पीसीएमटीचे एकत्रीकरण होऊन महामंडळ अस्तित्वात आले. नवीन कंपनी अस्तित्वात आल्यानंतर त्यासाठी प्रमाणित स्थायी आदेश करणे आवश्यक होते. ...

पीएमटी व पीसीएमटीचे एकत्रीकरण होऊन महामंडळ अस्तित्वात आले. नवीन कंपनी अस्तित्वात आल्यानंतर त्यासाठी प्रमाणित स्थायी आदेश करणे आवश्यक होते. पण आतापर्यंत जुन्या स्थायी आदेशानुसारच कामकाज सुरू होते. प्रशासनाने २०१० मध्ये सहाय्यक कामगार आयुक्तांकडे मसुदा दाखल केला होता. मात्र, पुढील आठ वर्ष विविध कारणांनी त्यावर निर्णय होऊ शकला नाही. २०१८ मध्ये जुना मसुदा काढून घेत नवीन मसुदा दाखल करण्यात आला. सहायक कामगार आयुक्तांनी पीएमपीतील ७ ते ८ कामगार संघटनांना नोटीस देऊन वाटाघाटीस बोलविले. जवळपास दोन वर्षे हे काम सुरू होते. अखेर दि. १४ सप्टेंबर २०२० रोजी त्यांनी काही बदल करून प्रशासनाने दिलेला स्थायी आदेश प्रमाणित केला.

पीएमटी कामगार संघ (इंटक), पुणे महानगर परिवहन महामंडळ कर्मचारी महासंघ, पीएमपीएमएल कामगार संघ या तीन संघटनांनी स्थायी आदेशाविरूध्द औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी नुकत्या झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने इंटक व कामगार संघ या दोन संघटनांचे अपिल रद्द केले. तर महासंघाचे अपिल अंशत: मान्य करून सहायक कामगार आयुक्तांचे आदेशही काही बदलांसह मान्य केले. या प्रकरणात पीएमपी प्रशासनातर्फे अ‍ॅड. अस्मिता वाचासुंदर व अ‍ॅड. अजय देशपांडे यांनी काम पाहिले.

चौकट

औद्योगिक न्यायालयाने स्थायी आदेश प्रमाणित करण्यास मान्यता दिली आहे. न्यायालयाने केवळ एकाच संघटनेचे अपिल अंशत: मान्य केले. त्यामुळे मसुदा स्थायी आदेशामध्ये किरकोळ बदल करून प्रमाणित करण्यास मान्यता मिळाली आहे.

- अ‍ॅड. अस्मिता वाचासुंदर

---------------